सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने संविधान दिन साजरा.

0
583

लाडक्या बहिणींनी संविधान दिनी केले डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने संविधान दिन साजरा.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर 

आजच्या दिवशी भारतीय संविधानाचा जन्म झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला होता.संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. दिवशी भारतीय नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे वचन दिले पाहिजे.

संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना अभिवादन! आपण संविधानाच्या मूल्यांचे पालन करूया आणि भारतीय लोकशाहीला मजबूत करूया! असे विचार किरण देरकर संस्थापक अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी यांनी व्यक्त केले.

ह्यावेळी चंदा मुन माजी पंचायत समिती सदस्य पुष्पा भोगेकर माजी पंचायत समिती सदस्य, वृषाली खानझोडे माजी उपासभापती वणी, मंदा सोनारखन, प्रगती घोटेकर, मिनाक्षी मोहीते, सुरेखा ढंगळे, मंजू इनामे, वेणु झोडे, लता फलफुलवार, माजी सरपंच शिरपूर सारिका थेरे, सिमा बालगुणे, महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here