मध्यरात्री कायदा पायदळी तुडवत जेसीबी लावून दुकान तोडले.

0
1114

कायदा पायदळी तुडवत, मध्यरात्री जेसीबीने दुकान पाडून केले 20 लाखाचे नुकसान, गुन्हा दाखल. JCB जप्त, दोन ऑपरेटर जेल मध्ये, समीर रंगरेज यांचेवर गुन्हा दाखल.

रात्री पुन्हा वाद, पंकजने मागितली पोलीस सुरक्षा. समीरने स्वतः लेखी पत्र देवून केली दुकान पाडल्याची कबुली.

राजू तूरणकर —वणी.

वणीतील माळीपूरा परिसरातील मुख्य रोडवर असलेल्या नवकार फर्निचर च्या दुकानाला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने पाडून जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वणी पोलिसात एक इसमावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील माळीपूरा येथे पंकज बन्सीलाल भंडारी (47) यांचे  फर्निचरचे दुकान आहे. ते 2006 या वर्षांपासून   आपला व्यवसाय करीत आहे. सदर दुकाना पैकी काही भाग हे समीर रंगरेज यांनी लुलेकर यांचे कडून विकत घेतले असून याबाबत ताबा मिळण्याबाबत न्यायालयात केस सुरू असल्याची माहिती आहे. याकरिता अनेकदा पंकज याला दुकान खाली करण्याबाबत धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तेव्हा पंकज यांनी  न्यायालय जो निर्णय देणार तो मान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी समीर रंगरेज यानी बुधवार 11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंकज यांच्या दुकान हे जेसीबी मशीनने तोडले व दुकानातील 1 लाख 20 हजार नगदी व 50 हजराचा सामान व दुकानाचे 18 लाख असे एकूण 19 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान केले असल्याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार वणी पोलिसात कलम 457, 380, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने कायदा हातात घेऊन, गुंडप्रवृत्तीने jcb लावून दुकान तोडल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून, असली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

समीर रंगरेज वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून वणीत प्रचलित आहे. याअगोदारही त्यांचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत.  समीर रंगरेजवर मारहाण, रेती चोरी, गाडीची तोडफोड करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.  हा गुन्हा दाखल झाल्यावर समीर फरार असून त्याला अटक होणार काय? याकडे सर्व वणीकर जनतेचे लक्ष वेधले आहे.

रात्री पुन्हा महिलांनी घातला वाद, पंकजची पोलीस प्रशासनाला स्वरक्षणाची मागणी.

रात्री दुकान तोडल्याने रस्त्याच्या बाजूला टिना ठोकण्याचे काम सुरू असताना, तिथे काही महिला येवून पंकज सोबत वाद घातला, घाबरलेल्या पंकजने पुन्हा पोलीस ठाण्यात जावून टक्रार देत, स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पोलिस स्वरक्षणाची मागणी केली.

समीरने मात्र स्वतः काल सकाळी 6वाजता पोलीस ठाण्यात जावून एक लेखीपत्र देवून दुकान पाडल्याची  कबुली सहिनिशी दिली आहे, त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करताना कसलीच अडचण आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here