बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे वणीत आयोजन

0
119

बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे वणीत आयोजन.
प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर 

शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष.२०१५ पासुन प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेला सुरुवातीपासूनच श्रोत्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही व्याख्यानमाला बौद्धिक मेजवानीत रस घेणाऱ्या सुजाण श्रोत्यांनी स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीतून आयोजित करण्यात येते.

यावर्षी ही व्याख्यानमाला २८ व २९ डिसेंबर २०२४ रोज शनिवार व रविवार ला बाजोरिया लॉन येथे पार पडेल.सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होणाऱ्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेला प्रख्यात साहीत्यिक प्रा.रंगनाथ पठारे संबोधित करतील.पहिल्या दिवशीचे स्मृतीपुष्प रामचंद्र जागोजी सपाट यांना समर्पित असुन “सामाजिक वास्तव: काल आज आणि उद्या” या विषयावर विचारमंथन होईल.तर नारायणराव सांबशिव देवडे यांना दुसरे दुसऱ्या दिवशीचे स्मृतीपुष्प समर्पित असुन “साहित्य कशासाठी?” या विषयांवर पठारे संबोधन करतील.दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रशासकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.दरवर्षी प्रमाणेच श्रोत्यांनी याही वर्षी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा बौद्धीक आस्वाद घ्यावा.असे आवाहन शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत,निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी वणीकरांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here