छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या साहीत्याचे देण !

0
73

छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या साहीत्याचे देण !

 प्रा.रंगनाथ पठारे यांचे बळीराजा व्याख्यानमालेत प्रतिपादन.

राजु तुरणकर – संपादक.

साहित्य सकस असेल तर ते महापुरुष आणि क्रांतिकारक जन्माला घालु शकते.महाराष्ट्रात इसवी सन तेरावे ते सतराव्या शतकात संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत तुकाराम महाराज यांनी आपल्या उच्च कोटीच्या साहित्याच्या माध्यमातून समाजाची मनोभुमिका तयार केली.त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोकोत्तर पुरुष जन्मास येऊ शकला.क्रांतीसाठी समाजाच्या मन आणि मेंदुची मशागत साहित्य करत असते.सोबतच साहित्याच्या दर्जावर राजकारण्यांची वैचारिक उंची ठरते.असे प्रतिपादन प्रा.रंगनाथ पठारे यांनी वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशीच्या “साहित्य कशासाठी ? ” या विषयावरील सत्रात केले.

शिव महोत्सव समिती व्दारा आयोजित स्थानिक बाजोरिया लॉन येथे दि.29 डिसेंबरला सायंकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी होते.सांबशिव नारायणराव देवडे यांच्या स्मृतीस हे विचारपुष्प राजेंद्र देवडे यांचे सौजन्याने गुंफण्यात आले.पुढे बोलतांना पठारे म्हणाले की,भाषा ही मानवाला लाभलेली अनमोल देणगी आहे.लिपी ही सिंधू संस्कृतीची देण असून अरबांनी ती जगात नेली.साहित्य हा मानवी मनाचा आरसा असून त्यातून ईच्छा,आकांक्षा,आशा प्रतिबिंबित होतात.संत तुकारामांनी साहित्याला एका उच्च कोटीवर नेले म्हणून जगामध्ये तुकारामांचे साहित्य ही भारताची ओळख आहे.साहित्य केवळ मनोरंजना करिता नसावे.तर त्यातुन सामान्य माणसांच्या दुःखाचे,भावनांचे,जगण्याचे प्रतिबिंब दिसावे.स्वातंत्र्यानंतरच्या साहित्यिकांच्या पहिल्या पिढीने सामान्य भारतीय माणसाला केंद्रस्थानी ठेवले नाही.त्याचा परिणाम म्हणुन सद्याचे उदासीन,सुखासीन वातावरण आहे.आणि उंची नसलेले राजकारणी आहेत.सद्याच्या गळचेपीच्या वातावरणात लेखकांनी जबाबदारीने भुमिका घेउन जगले पाहिजे.तरच महाराष्ट्र धर्म जिवंत राहील.प्रस्थापित धारणांना छेद देणारे लेखन करण्याची जोखीम पत्करल्याशिवाय उच्च दर्जाचे लोकाभिमुख साहित्य निर्माण होणार नाही.म्हणुनच मन परिवर्तनासाठी साहित्य हे मोलाची कामगिरी पार पाडतात,असे पठारे यांनी प्रतिपादन केले.यावेळी त्यांनी जगातील फ्रान्स आदी देशातील साहित्य आणि राजकीय क्रांतीचा संबंध उलगडून दाखवला.आणि मानवी जीवनातून साहित्य वजा केले तर मानव आणि प्राणी यात काही फरक असणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष मनोगतामधुन शहाबुद्दीन अजाणी यांनी वणीकर श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून भविष्यातही सकस विचार देणारे वक्ते आणि विचारवंत येत राहील,अशी ग्वाही दिली.यावेळी विचारपीठावर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, किरण देरकर,  एड.हमिरा शरीफ,प्रवीण इंगोले,सुभाष आडे, अजय धोबे  उपस्थित होते.कार्यक्रमाचा प्रारंभ अभिवादन आणि जिजाऊ वंदनेने झाला.प्रास्ताविक भुमिका संजय गोडे यांनी मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शेरकी यांनी तर उपस्थितांचे आभार रघुनाथ कांडळकर यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला.मंचावरील पाहुण्यांचे स्वागत प्रा.विजय बोबडे, राजेंद्र देवडे,दिलीप पेचे,प्रा.डॉ.गजानन सोडणर,भारती राजपुत,सोनाली जेनेकार,संजय मादेवार,वसंत थेटे,आशिष रिंगोले,नितेश ठाकरे यांनी ग्रंथ भेट देऊन केले.शिव महोत्सव समिती च्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या दोन दिवशीय व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजना करीता प्रामुख्याने सुरेंद्र घागे,मारोती जिवतोडे,संदीप ठाकरे,वैभव ठाकरे,भाऊसाहेब आसुटकार, विजय दोडके, रामकिसन ताजने,व्यंकटेश ताटेवार, अमोल बावणे आदींनी परिश्रम घेतले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here