पंचवीस वर्षा नंतर झाली प्रगतीनगरची प्रगती.

0
292

प्रगती नगर ची अनेक वर्षानंतर झाली प्रगती, विकास कामांची प्रतीक्षा संपली.

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे प्रगतीनगर मधील नागरिक प्रचंड खुश. विकासापासून कोसो दूर असलेल्या प्रगतीनगराची विकासाची प्रतीक्षा संपली.

राजू तूरणकर—वणी.

प्रगतिनगर मधील नागरिक अनेक वर्षापासून विकासकामांच्या बाबतीत कामांची प्रतीक्षा करीत होते. या प्रभागाला जनप्रतिनिधी आतापर्यंत सांगकामे मिळाल्याने जनता त्रस्त झाली होती. मात्र आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना सहा महिण्यापूर्वी रिता महेश पहापळे यांच्या सह अनेक रण रागिणी भेटून वार्डाची पाण्याची, रोडची समस्या मांडली, आमदारांनी शब्द दिला, स्वतः वार्डाची पाहणी केली आणि आज रोजी प्रगतीनगर ची प्रगती झाली. अनेक वर्षापासून रडखडून असलेला विकास प्रगती नगर वसियानी प्रत्यक्ष अनुभवला, आज आमदार महोदयांनी प्रगति नगर ला भेट दिली, कामांची पाहणी केली. येथिल शितला माता मंदिरातील परिसराची पहानी केली. मंदिरा करिता नळ कनेक्शन देण्याची ग्वाही दिली यावेळी वॉर्डातील महिला उपस्थित होत्या.

या भागातील नागरिक गेली २5.वर्षे विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. “लोकवाणी जागर” ला दिलेल्या प्रतिक्रियांमधून नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘या भागातील नगरसेवकांनी आमच्याप्रमाणे एक दिवस व्यतीत करून पाहावा. गेल्या 25 वर्षांपासून विकास हा शब्द फक्त ऐकत आलो. मात्र, तो आम्ही कधीच अनुभवला नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. गेल्या 25 वर्षात किती नगरसेवक आले व गेले पण रोड टाकण्यात नगरसेवक असमर्थ ठरले.पण साहेबांनी शब्द दिला व आज खर्या अर्थाने प्रगतीनगर ची प्रगती झाली.सगळे रोड सिमेंट चे,,,,जे नगरसेवकांना जमल नाही ते साहेबांनी करुन दाखवलं ,पाळणात आलेल्या डुकरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका प्रशासन व नगरसेवक बोलण्यास नकार देत आहे.
प्रगतीनगर, जैन लेआऊट, गुरूनगर, फाले, भोंगळे लेआऊट मध्ये भागात येतो. या भागातील नगर सेवकांच्या हाताची ड्रेनेज कामे अपूर्ण असून रस्त्याची कामे निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी अनेकदा नगर सेवकावर केला आहे. नगरसेवक व त्यांचे नातेवाईक व्यवसाया करिता नगर पालिकेत सत्ता गाजवत असल्यामुळे ते केवळ व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या भागात विकासकामे करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वी जे रोड राहाले त्या रोड संदर्भात गिता तुराणकर,संगिता बोथले,किरण डोंगरकर,आनिता पारखी,सुनिता चार्लेकर, ज्योति कापसे, किर्ती उपरे,नंदा कोंगरे,शालु ढेंगळे,बोबडे, बबिता शिंदे,गाताडे, बेबी थाटे या महिलांनी रिता महेश पहापळे यांचे मार्फत आमदार साहेबांना विनंती केली .साहेबांनी राहलेली कामे लवकरच करु असा शब्द दिला.

आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सातत्यपूर्ण प्रत्यानांमुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात विकास सुरू आहे. त्यांच्या कार्यप्रणाली मुळे वणी विधानसभा क्षेत्रात जनता त्यांच्यावर प्रचंड खुश आहे. प्रगती नगर मधील महिलांच्या हाकेला आमदारांनी साथ दिल्याने प्रगती नगरची जनता प्रचंड खुश आहे. यावेळी कमलबाई मिलमिले , कुंदाताई वरारकर, रिताताई पहापळे , सुनिताताई ढवस,गिताताई ताजणे, विणा मांडवकर, शितलताई नार्लावार,आशाताई पिंपळशेंडे शशीताई राजूरकर ,सिमाताई बोबडे, संगिता मत्ते, मंगलाताई कालेकर,सुनिताताई बदखल, निशाताई खारकर, मोहितकर, लताताई बलकी, पेंदोरताई या महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here