वणी विश्राम गृहात पत्रकार दिन साजरा, माधवराव सरपटवार व संजय खाडे यांचा सत्कार.

0
194

न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन तर्फे वणी विश्राम गृहात पत्रकार दिन साजरा.

पत्रकारांमध्ये निष्पक्षपातीपणा आणि निर्भयपणा हे दोन गुण महत्त्वाचे – जेष्ठ पत्रकार माधवराव सरपटवार

राजु तुरणकर – संपादक.

पत्रकारांमध्ये  निष्पक्षपातीपणा आणि दुसरा निर्भयपणा हे दोन गुण आवश्यक असल्याचे  मत ज्येष्ठ पत्रकार माधवराव सरपटवार आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी रोजी न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या वतीने आयोजित शासकीय विश्रामगृहात पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार माधवराव सरपटवार  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय खाडे, तथा मानविहक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष, जेष्ठ पत्रकार राजु भाऊ धावंजेवार उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ पत्रकार माधवराव सरपटवार सर आणि संजय खाडे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संजय खाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारांनी निष्पक्षपणे पत्रकारिता केली पाहिजे मी सदैव पत्रकारांच्या सुखदुःखाच्या वेळी पाठीशी असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले. प्रास्ताविक लोकवाणी न्यूज पोर्टल चे संपादक राजु तुरणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आसिफ शेख यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव परशुराम पोटे व महादेव दोडके यांनी परिश्रम घेतले.

यावेळी न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष दिपक छाजेड, माजी अध्यक्ष आसिफ शेख, सचिव परशुराम पोटे, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा, निलेश चौधरी, सागर मुने, महादेव दोडके, विशाल ठोंबरे, रविंद्र कोटावार, ज्ञानेश्वर बोनगीनवार यांच्यासह राजु तुरणकर, सुनील तुगणायत , मनोज नवले, रामकृष्ण वैद्य, श्रीकांत किटकुले, विनोद ठेंगणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here