मालमत्ता व पाणी करावर लावण्यांत आलेल्या व्याजाची रक्कम माफ करा:- युवासेनेची मागणी.

0
127

मालमत्ता व पाणी करावर लावण्यांत आलेल्या व्याजाची रक्कम माफ करा:- युवासेनेची मागणी.

पाणी पुरवठा वर्षातून पाच महिने, कर आकारणी वर्षाची, वरून व्याज व दंड आकारणी, नगर परिषदेच्या अफलातून कारभार – अजिंक्य शेंडे.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर 

वणी न.प हद्दीतील मालमत्ता व पाणीकर धारकांकडून करवसूल करण्यात येते.संभवत: मालमत्ता व पाणीकर धारकांनी काही अपरिहार्य कारणास्तव तसेच आर्थिक अडचणीमुळे कराची रक्कम वेळेत भरणा केली नाही.मात्र आता अनेक करधारक सध्यास्थितीत कराचा भरणा करण्यास तयार आहेत.परंतु भरमसाठ रक्कम व्याजाचे व दंडाच्या स्वरूपात आकारण्यात आल्यामुळे कराच्या रक्कमेत अतुलनीय वाढ दिसून येत आहे.

नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्याकरिता भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरूपात आकारण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच महागाईची डोकेदुखी आणि त्यात व्याजाची भरमसाठ रक्कम कराचे स्वरूपात आकारणे म्हणजे सामान्य नागरिकांवर अन्याय ठरत आहे. यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्याज माफ करून मुद्द्दल रक्कम वसूल केली आहे. व्याज माफीचा ठराव करण्यात यावा.

पाणी पुरवठा वर्षातून पाच महिने केला जातो, तर कर आकरणी वर्षाची व वरून व्याज व दंड आकारणी करण्यात येते ही बाब वणीकर जनतेवर अन्याय कारक असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

कराचे स्वरूपात आकारण्यात येत असलेली व्याजाची रक्कम माफ करून वरील कर मुद्दल स्वरूपात आकारण्यात यावा ही मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांना निवेदन देऊन केली आहे. व्याजाची रक्कम आकारल्यास युवासेना वणीकर जनतेची गळचेपी सहन करणार नाही व या विरोधात युवासेनेकडून तिव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल. निवेदन देते वेळी वणी शहरातील अनेक गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेनेचे माजी माजी उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, माजी नगरसेवक राजू तुरणकर,  विनोद ढुमणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here