वादग्रस्त शिपाई पदभरती परिक्षार्थ्यांचे उद्या आमरण उपोषण.

0
307

वादग्रस्त शिपाई पदभरती परिक्षार्थ्यांचे उद्या आमरण उपोषण.

तक्रारीची दखल न घेतल्याने पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्या कार्य शैलीवर प्रश्नचिन्ह.

राजु तुरणकर – संपादक.

वणी : नांदेपेरा ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदाकरीता झालेल्या परीक्षेत घोळ झाल्याचे सबळ पुरावे असताना सुद्धा केलेल्या तक्रारी नंतर ही काहीच कार्यवाही न झाल्याने शेवटीं पीडित परिक्षार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दिनांक १५ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले आहे.

दिनांक ३० डिसेंबर२०२४ ला नांदेपेरा येथील ग्रामपंचायत साठी रिक्त असलेल्या शिपाई पदाची जागा भरण्यासाठी लेखी परीक्षा वणी पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी यांचे देखरेखीत घेण्यात आली. या परिक्षेत विशिष्ट उमेदवाराला पास करण्याकरिता बैठक व्यवस्था बदलवून सर्वात शेवटी बसवून सहकार्य परीक्षकाकडून करण्यात आले. नंतर परीक्षेचा अर्ध्या तासानंतरच तोंडी निकाल घोषित करून सहकार्य करण्यात आलेल्या उमेदवाराला पास करण्यात आले. तसेच परीक्षार्थ्यांच्या प्रश्न पत्रिका सुद्धा परिक्षा झालेवर वापस घेण्यात आल्या. जो विद्यार्थि पास झाला त्याच्या हाताला डिजिटल घड्याळ बांधले होते. आणि नेहमीच्या वापरात तो ही घड्याळ कधीच वापरत नाहीत. त्याचा पेपर मध्ये उतिर्न गणितात  आसलेल्या पोराला पूर्ण गणिताचे प्रश्न बरोबर कसे, त्याचाच पेपर सर्वात शेवट तपासून त्याचीच सही सर्वात शेवट घेणे अशी अनेक प्रश्र्न उपस्थित होतात. त्यामुळे ह्या परीक्षेत प्रथमदृष्ट्या घोळ झाल्याचे आढळून येत असल्याने पीडित पारिक्षार्थ्यांनी दि. ३१ डिसेंबर २०२४ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कडे तक्रार केली, त्यानंतर २ जाने २०२५ ला जिल्हाधिकारी यवतमाळ,मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कडे केली तक्रार परंतु या संदर्भात कुठलीही पावले न उचलल्या गेल्याने दि. ८ जानेवारी २०२५ ला उपविभागीय अधिकारी वणी यांनी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांना ७ दिवसात चौकशी, कार्यवाही व झालेली परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेवटी परिक्षार्थ्यांनी दिनांक १५ जानेवारी२०२५ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करीत असल्याचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखा प्रमुख ( उ.बा.ठा.) सुरेश शेंडे यांचे नेतृत्वात आणि युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, राजु तुराणकर माजी शहर शिवसेना वणी,संजोग झाडे युवासेना सचिव नांदेपेरा यांच्या उपस्थितीत  सचिन चिकटे, प्रवीण खैरे, तुषार खामनकर, साहिल ठमके, अजय कीन्हेकार, पवन कोडापे, राहुल वांढरे, धीरज खामनकर, प्रफुल पावले आदी परिक्षर्थ्यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here