मार्कण्डेय पोदार लर्न स्कूलमध्ये क्रीडा संमेलन संपन्न.
राजु तुरणकर – संपादक.
वणी- मार्कण्डेय पोदार लर्ने स्कूलचा प्राप्ती वार्षिक क्रीडा महोत्सव (२०२४-२५) मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे संजय देरकर, आमदार वणी आणि सन्माननीय अतिथी किरणताई देरकर, सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते शाळेचा ध्वज फडकवून, दीपप्रज्वलन, मशाल प्रज्वलन आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रीडा सम्मेलनाचे थाटात उद्घाटन झाले.
शाळेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार, शाळेचे सचिव राहुल सुंकुरवार, कविता सुंकुरवार, माधुरी सुंकुरवार, प्राची सुंकुरवार यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. विद्याध्यर्थ्यांनी शानदार मार्च पास्ट सादर करीत उपस्थित पाहुण्यांना मानवंदना दिली.
क्रीडा सम्मेलनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विशेष अतिथी सीता वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक, वणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या प्रसंगी नर्सरी ते इयत्ता दुसरीच्या मुलांनी मनोरंजक खेळ, रोमांचक रिले शर्यती आणि नेत्रदीपक कवायती सादर करून सर्वांचे लक्ष्य आकर्षित केले.
क्रीडा स्पर्धेच्या दुसत्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी, आणि सन्माननीय अतिथी डॉ. सचिन गाडे, मुख्य अधिकारी नगरपरिषद, वणी, अजय शर्मा, व्यवस्थापक, कार्तिकय कोल वॉशरीज, वणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यती, मजेदार खेळ आणि विविध सांघिक खेळ सदर करीत उपस्थित पाहुण्यांच्या कौतुकाची दाद मिळविली.
क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अनिल बेहरानी, पोलीस निरीक्षक, वणी यांनी विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांचे अभिनंदन केले.
बक्षिस वितरण समारोहाप्रसंगी सन्माननीय पाहुणे सतीश जांभुळे, वैद्यकीय अधिकारी, शिरपूर, अमन टेमुर्डे, महाव्यवस्थापक, पोदार एज्युकेशन नेटवर्क, नागपूर विभाग, डॉ. वैशाली टेमुर्डे आणि विशेष अतिथी वर्षाताई बोडे, सरपंच, मंदर, अनंत बोते आणि प्रतिभा उपरे, उपसरपंच, मंदर यांनी विजेत्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना पदके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देवून त्यांचे अभिनंदन केले
शाळेच्या क्रीडांगणात उभारलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते-२०२४ च्या स्टैंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विजेत्या पालक आणि विद्यार्थ्यांचा विजयरथ पुरस्कार सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला.
तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेचा समारोप विशेष निमंत्रित अतिथी उमेश चंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक, डब्लुसिएल, वणी (उत्तर) यांच्या कडून शाळेचा ध्वज उत्तरवून करण्यात आला.
मुख्याध्यापक भूषण अलोणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शाळेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार यांनी कर्मचारी आणि विद्याव्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.