मॅकरून स्कूलमध्ये ‘ द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ स्नेहसंमेलन संपन्न.

0
93

मॅकरून स्कूलमध्ये ‘ द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ स्नेहसंमेलन….

संम्मेलनात अलोट गर्दी.

समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थ्यांनी केले नृत्य सादर.

राजु तुरणकर वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वणी शहरातील प्रसिद्ध मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सि.बी.एस.ई स्कूलमध्ये ‘द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ वार्षिक स्नेहसंमेलन (दि.31) जाने रोजी एस.बी.लॉन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.

या ‘द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी व उद्गाटक म्हणून शिक्षणमहर्षी पी.एस.आंबटकर तर सत्कारमूर्ती म्हणून वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजय देरकर व शाळेचे उपसंचालक पियूष आंबटकर तसेच प्रमूख पाहूणे म्हणुन वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वाहतूक शाखा प्रमूख सिता वाघमारे, डायरेक्टर ऑफ एम.एस.पी.एम अंकिता आंबटकर, डायरेक्टर ऑफ पॅरमाऊंट प्रांजली रघताटे,डायरेक्टर ऑफ सोमय्या पायल आंबटकर, वणी शाळेचा मुख्यद्यापिका शोभना आणि एम.एस.पी.एम ग्रुपचे सर्व मुख्यद्यापक उपस्थित होते. या मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले.यात सर्वात आधी मुख्यद्यापिका शोभना यांनी वर्षभराचा कार्यआलेखाचा पाढा वाचला तसेच पालकांनी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कला , क्रीडा यासारख्या इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना झेप घेण्यास प्रोत्साहित करावे,असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात पि. एस आंबटकर यांनी केले.या वार्षिक समारंभात प्ले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी एकांकिका, गायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते ,झांसी की राणी चे ऐतिहासिक प्रसंग,आईचे प्रेम, सायबर क्राईम यासारख्या सामाजिक उद्बोधन दर्शविणाऱ्या तर दमलेल्या बाबाची कहाणी यासारख्या मनाला स्पर्श करणाऱ्या भावनिक तसेच हेरा फेरी सारख्या हास्याचे फवारे उडवणाऱ्या थीम मधून चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिंकून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शोभना यांनी केलें .

तर अर्चना व रूपाली यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर तथा पालकांच्या तोंडून वाहवा मिळवली. तर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटी यांच्या मार्गदर्शनात पार पडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here