वणी जिल्हा निर्मिती सह वणी येथे IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करा – अजिंक्य शेंडे.

0
370

वणी जिल्हा निर्मिती सह वणी येथे IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करा – अजिंक्य शेंडे.

वणी उपविभागात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळसा खाणीतील कोळसा तस्करी वर नियंत्रण ठेवण्यासाठी व परिसरातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी युवासेना आक्रमक.

राजु तुरणकर – संपादक.

मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वणी जिल्हा झाला पाहिजे हि मागणी आहे व वणी परिसरात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कोळसा खाणी आहेत. यावर स्थानिक अधिकारि वचक ठेवण्यात कमी पडत आहे .वा वेकीलीचे अधिकारि यांना जुमानत नाहीत. त्यामुळे परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा खाणीतील कोळसा, भंगार व तांबे तार चोरी तस्करी सुरू आहे यामुळे केन्द्र सरकारचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.हि बाब हेरून युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून वणी जिल्हा निर्मिती व तोवर वणी उपविभागीय अधिकारी पदी IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

वणी जिल्हा व्हावा व त्यानुसार उपविभागातील समस्यावर वणी जिल्हा निर्मिती नंतरच उपाय ठरेल. जिल्हा निर्मितीनंतर आयएस , आयपीएस दर्जाचे अधिकारी या ठिकाणी येणार त्यामुळे अनेक समस्या वर आपोआपच वचक बसेल. आपले सारखे सक्षम नेतृत्व असलेले राज्य सरकार आहे जर वणी जिल्हा निर्मिती झाली असती तर ह्या ज्या अनुचित घटना वणी शहरांमध्ये घडल्या या कदाचित घटना घडल्या नसत्या. ज्याप्रमाणे 1)स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएम मध्ये पैसे टाकणाऱ्या संतोष वाटेकर युवकाचा खून त्याचा अजूनही न लागलेला तपास.2) कोळसा रॅक खाजगी रेल्वे सायडिंगवर नोकरी करणारा संतोष गोमकर याचा संशय मृत्यु कामठी येथे त्याचा मृतदेह रेल्वे कोळसा व्ह्यागण मध्ये आढळुन आला अजूनही तपास पूर्ण झाला नाही.3) स्वप्निल धुर्वे यांचा संशयास्पद मृत्यू 4) बहुचर्चित ललित लांजेवार यांचा मृत्यू पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याने धमकवल्यामुळे झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. व वणी शहरात घडलेल गोहत्या कांड ह्या सर्व घटनांची चौकशी पुन्हा नव्याने व्हावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक कोळसा खाणी या परिसरात असल्याने या परिसरात कोळसा तस्करी, बायो डिझेल तस्करी, दारू तस्करी, रेती तस्करी, गुटखा तस्करी, गांजा तस्करी आणि गो- मास तस्करी या व्यवसायाने फार मोठ्या प्रमाणामध्ये डोके वर काढले आहे. यामध्ये अनेक प्रशासनातील कर्मचारी लिप्त असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाले आहे. पाहिजे तेवढ्या गंभीर घटनाक्रम लीहता येइल.

वणी शहर विदर्भाच पुणे म्हणुन सुसंस्कृत अशी ओळख असलेले शहर आता गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळले आहे. कोळसा खाणीच्या माध्यमातून आलेला परप्रांतीय लोंढा, बांगलादेशी घुसखोर अशी अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक परीसरात दडून असल्याची चर्चा आहे. प्रशाशन माञ केवळ सारवासारव करीत असते, किव्हा ह्या सर्व प्रकरणाची उकल करण्यासाठी कमी पडत आहे.

चोऱ्या,रॉबरी, नियंत्रित ट्राफिक कंट्रोलींग, गोवंश हत्या कांड अंगावर शहारे आणणारी हिंदुत्वाला आव्हान झालेले आहेत. गोहत्या प्रकरणात पोलिसांनी कडक करवाई न केल्याने लगेच चार दिवसानंतर पुन्हा गाईचे मुंडके कापून फेकल्याची घटना रजा नगर वणी मध्ये उघडकीस आली परंतू सदर आरोपी पळून गेले. अजूनही तपास थंडबस्त्यात आहे.करिता वणी शहारातील सामजिक धार्मिक कायम असलेला एकोपा टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे व सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी IAS,IPS दर्जाचे (भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी) वणी जिल्हा होईपर्यंत वणी उपविभागात भारतीय प्रशासकिय सेवेतील अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याची मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत निवेदन देवून केली आहे. यावेळी माजी शहर प्रमूख राजु तुरणकर, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर, निखील मडावी, प्रमोद हनुमंते, सोनू नरद, गणेश भोयर, किशोर ठाकरे, संजोग झाडे, गुड्डू दुर्वे, सुरेश शेंडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here