शिबला येथील आश्रम शाळेत आ. संजय देरकरांनी काढली रात्र

0
110

शिबला येथील आश्रम शाळेत आ. संजय देरकरांनी काढली रात्र.

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत रात्र काढून समस्यांचा अभ्यास करणारे वणी विधानसभा क्षेत्राचे पहिले आमदार.

चिमुकल्यांच्या ढेमसा नृत्याने जिंकले आ. संजय देरकरांचे मन

वणी :- येथून जवळच असलेल्या झरीजामणी तालुक्यातील शिबला येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत चिमुकल्यांशी संवाद या कार्यक्रमांतर्गत काल ता. ७ रोजी ८ वाजता रात्री वणीचे विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत एक रात्र तिथेच काढल्याने सर्व मतदार संघात आपुलकीचा आमदार म्हणून चर्चा होताना दिसून येत आहे.

शिबला येथील शासकीय आश्रम शाळा ही सन १९७२ पासून सुरू असून या ठिकाणी दरवर्षी चारशे ते पाचशे विद्यार्थी आपले शैक्षणिक भविष्य घडवीत असतात येथील आश्रम शाळेत या वर्षी देखील चारशे १७१ मुली तर दोनशेच्या वर मुळे आहे. वर्ग ५ ते १२ वी पर्यंत ही आश्रम शाळा आहे. उत्कर्ष २०२५ म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन करून त्यांच्या कडून त्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांची विचारपूस केली. तसेच विद्यार्थ्यांनी गीत गायन ,नृत्त सादर केले, आपापल्या भूमिका कथन केल्या आमदारांनी खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून त्यांना प्रोत्साहन मिळेल अश्या पद्धतीने संबोधन केले. आश्रम शाळेच्या वतीने

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांनी केले. तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जे.जी. कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार, दिलीप भोयर कृ. ऊ.बा.स.चे माजी सभापती संतोष कूचनकर, शिबला ग्राम पंचायतीचे सरपच्या सौ. तोडासे ,अखिल कोठारे, कुंदन टोंगे, प्रदीप दुधकोहळे , पाडुरंग पोयाम ,ग्रा. सदस्य रंजना गेडाम,रेश्मा पुसाम, नंदा नैताम. आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिघाडे प्रास्ताविक उमाळे अधीक्षक भटकर व अधिक्षिका बारावी मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here