आज कोलगाव येथे,” सदू चे लग्न ” नाटक…
तुफान विनोदी नाटकाने उडणार धमाल, सर्वांना मोफत…..कोलगांव वासियांकडून सर्वांना धमाल विनोदी नाट्यमय मेजवानी.
राजु तुरणकर मारेगावं – तालुक्यातील कोलगांव येथे आज रात्री सात वाजता तुफान विनोदी दोन अंकी नाटक “सदू चे लग्न” चा नाटय प्रयोग होणार आहे.
संपूर्ण विदर्भात गाजत असलेल्या या नाटकाचे आयोजन ग्राम पंचायत कोलगाव, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगावं चे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व संपूर्ण ग्रामवासी, कोलगावं यांनी केले आहे. गावातील विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा मंदिराच्या भव्य प्रांगणात हा नाट्य प्रयोग आज रंगणार आहे.
या नाटकास प्रत्येक ठिकाणी तुफान गर्दी असते. प्रेक्षक वर्ग पोट धरून हसायला लागतात. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत हे नाटक तुफान गाजलेले आहे.
मारेगावं येथील हौशी नाट्य कलावंत यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.
या नाटकाचे लेखक स्वर्गीय किशोर डहाळे यांनी केले आहे. नाटकात प्रमुख भूमिकेत रमाकांत लखमापूरे, वैशाली वातिले, गुलशेर पठाण,गजानन कडूकर, आयेशा खान, अवंतिका मुरस्कर, वसीम शेख, विनेश मेश्राम, मेहमूद पठाण, व अनिल सोनावणे हे कलावंत आहे. रंगभूषा व वेशभूषा ॲड. रूनाली गाणार व ॲड. मेघा कोडापे यांची असून पार्श्वसंगीत आयोजन राकेश आत्राम यांनी केले आहे. रंगमंच सहाय्य सागर मडावी व मोरेश्वर कनकुंटवार यांनी केले आहे. नेपथ्य व रंगमंच निर्मिती मोरेश्वर कांबळे यांनी केली आहे तर ध्वनी व्यवस्था प्रवीण वाघमारे यांची आहे.
या तुफान विनोदी नाटकाचा प्रयोग रसिक प्रेक्षक यांनी आज रात्री आवर्जून बघावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.