गणेशपुर येथे छत्रपती शिवजयंती महोत्सव.

0
131

गणेशपूर येथे दोन दिवशीय छत्रपती शिवजयंती महोत्सव.

राजु तुरणकर – संपादक.

वणी  गणेशपूर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे गेल्या अनेक वर्षा पासून सुरु असलेल्या शिवजयंती उत्सवा चे आयोजन या वर्षी सुद्धा करण्यात आले आहे. येणाऱ्या 19 आणी 20 तारखेला दोन दिवसीय शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे.

19 फेब्रुवारीला छत्रपती स्मारक चिखलगाव येथे सकाळी 8 वाजता भव्य माल्यर्पण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. व दिनांक 20 तारखेला सायंकाळी 7 वाजता जीवनाशी संघर्ष करणाऱ्या इंडियन आयडल फेम, चेतन सेवानकुर तर्फे अंध कलावंतांचा अर्केस्ट आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून वणी येथील गटविकास अधिकारी मा किशोर गज्जलवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वणी पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा. गोपाल उंबरकर, स्वागतध्यक्ष मा ऍड कुणाल चोरडिया व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

तसेच या कार्यक्रमात छत्रपती समितीच्या वतीने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा. संजयभाऊ देरकर व किरणताई देरकर यांचा नागरी सत्कार होणार आहे. तरी गावातील व शहरातील सर्व नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती महोत्सव गणेशपूर च्या सर्व पधादिकारी, मार्गदर्शक व सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here