शिवसैनिकांची एकनिष्ठता हीच खरी शिवसेनेची ओळख – खा. संजय देशमुख

0
214

शिवसैनिकांची एकनिष्ठता हीच खरी शिवसेनेची ओळख – खा. संजय देशमुख

शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वप्नपूर्ती सोहळा.
वणी : शिवसेनेची ओळख म्हणजे शिवसैनिकांमध्ये असलेली एकनिष्ठता आहे. ही एक निष्ठता ज्यांच्या रक्तात आहे. ते रक्त कधीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. आहे प्रतिपादन यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांनी येथील एस.बी. लॉनच्या प्रांगणात काल ता. १५ रोजी रात्री ८ वाजता संपन्न झालेल्या शिवसेनेच्या स्वप्नपूर्ती या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड तर मुख्य अतिथी व सन्मान मूर्ती म्हणुन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर उपस्थित होते.

यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले तर व वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर हे विजय झाले होते. त्यामुळे शिवसैनिकात मोठा उत्साह निर्माण झाला होता,तसेच शिवसेना विभाजित होऊनही या भागात त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही उलट शिवसैनिक एकनिष्ठेने उद्धव ठाकरे यांचे सोबत एकजुटीने उभे होते. त्या सर्व शिवाशिवसैनिकानी हा कौटुंबिक सोहळा आयोजित केला होता.


दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजयभाऊ देशमुख , वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेन्द्र गायकवाड शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यवतमाळ यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, योगीता मोहाड यवतमाळ जिल्हा महिला संघाटिका, संतोष माहुरे वणी विधानसभा सहसंपर्कप्रमूख,डॉ अर्चना पाटील यवतमाळ, मनीष मस्की नगराध्यक्ष मारेगाव नगर पंचायत,ज्योती बीजगुणवार नगराध्यक्ष झरी नगर पंचायत,संकेत ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख यवतमाळ हे उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सत्कार व सन्मान सोहळा.
यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख व वैशाली ताई देशुमख व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व किरनताई देरकर यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व  विठ्ठल रुखमाई यांचे भव्य मोमिंटो देवुन आयोजन कमिटीचे दीपक कोकास माजी उपजिल्हा प्रमुख, रवि बोढेकर तालुका प्रमूख, गणपत लेडांगे तालुका संघटक,अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख, राजु तुरणकर माजी नगरसेवक, नितिन शिरभाते ज्येष्ठ शिवसैनिक, संजय देठे, प्रशांत बलकी उप शहर प्रमूख भगवान मोहीते, डॉ जगन जूनगरी, मनिष बत्रा, विनोद ढूमने, मंगेश मत्ते, आयुष ठाकरे युवासेना तालुका संघटक, सुरेश शेंडे शिवसैनिक, डीमन टोंगे उपजिल्हा संघाटीका, गीता उपरे सरपंच लालगुडा, सुनंदा गुहे महीला संघटीका, पुष्पताई भोगेकर माजी सभापती, किर्ती देशकर नगर सेविका, वनिता काळे महीला संघटिका मारेगाव तालुका, सविता आवारी ,चंदा मून माजी सभापती पंचायत समिति वणी, प्रभाताई आसेकर, सविता बलकी व सुनिल कातकडे वणी विधानसभा संघटक, संजय निखाडे उपजील्हा प्रमूख, शरद ठाकरे उपजिल्हा प्रमुख, सुधीर थेरे, अभय चौधरी शहर प्रमूख या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वणी,झरी, मारेगाव तीनही तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमांमध्ये प्रचंड जोश व उत्साहाचे वातावरण होते तर कौटुंबिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणपत लेडांगे यांनी तर सूत्रसंचालन राजू तुरणकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश कऱ्हाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here