बापरे बाप…..विद्युत पुरवठा करणाऱ्या चालू रोहित्रा तील बस बार जम्पर चोरी.. जनतेने रात्र काढली अंधारात.
खतरो के खिलाडी भंगार चोर, विद्युत विभाग व पोलीस प्रशसना समोर उघड आव्हान.
महावितरण कंपनीच्या शिंदोला सोसायटी, ,( गणेश गृह निर्माण जनता शाळा परिसर) वणी येथील ट्रान्स्फार्मर मधील तांब्याची कोईल चोरटयांनी आज रात्री दिनांक 1मार्च ला अंदाजे 3 ते 30 वाजे दरम्यान लंपास केली. रस्त्यालगत चालू ट्रान्स्फार्मर असणाऱ्या ट्रान्स्फार्मरची कॉईल चोरीला गेल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली तर अजुनही लाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नाही.
चालू ट्रान्स्फार्मरचा मुख्य वीजप्रवाह बंद करून, तांब्याची तार चोरुन नेल्याने संपूर्ण परिसर रात्र भर अंधारात होता. ट्रान्स्फार्मर , चालु प्रवाह असलेले विद्युत तार चोरीचे वाढते प्रमाण या कारणाने. पहिलेच वणी विद्युत वितरण कार्यालय संशयात आलेले आहे. हजारो लाखो रुपयांचे विद्युत तारे चोरीला गेल्याची अधिकृत रिपोर्ट दिल्या आहेत. डिसेंबर महिन्यात चिखलगाव येथे शेतात लावलेल्या नवीन विद्युत पुरवठा चालू करण्या पूर्वीच चोरांनी तारे चोरून नेल्या यापूर्वी तारे तोडून नेताना दोन ते तीन इसम मृत्युमुखी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या.ह्या अतिशय गंभिर बाबी असून चोर आता चक्क शहराच्या मध्यभागी असलेल्या वस्तीतून चालू डीपी वरील तांबे कॉइल्स चोरून नेण्यात यशस्वी झाल्याने, आता नागरिकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरीच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करावा व विद्युत वितरण मध्ये वणी परिसरात चालु असलेल्या चोऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार पकडुन तात्काळ बदल्या करुण यांच्या चौकश्या लावाव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.