अजिंक्य शेंडे यांचा पुढाकाराने अपघात ग्रस्त रुग्णांना मिळाली मदत.

0
754

अजिंक्य शेंडे यांचा पुढाकाराने अपघात ग्रस्त रुग्णांना मिळाली तात्काळ मदत.

अपघात ग्रस्त रुग्णांच्या हाकेला धावून, कोल वॉशरी प्रशासनाला धारेवर धरले.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी वरून काम आटोपून गावा कडे जात असताना दुचाकीला MH 40 CM 5159 या हायव्हा ट्रकने धडक दिल्याने ब्राह्मणी येथिल दोन इसमाला गंभीर इजा झाल्याची घटना काल 28 फेब्रुवारी ला सकाळी 10-30 वाजे दरम्यान घडली.

दुचाकीस्वार महादेव उपरे वय 45, तर महादेव मंगाम 55 ही रा . ब्राम्हणी अपघात ग्रस्थांची नावे असून उपरे यांचा पाय तर मंगाम यांच्या हाताला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले, त्यांना सुरुवातीला वणी येथिल शुगम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावरती प्रथमोपचार करून त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. दुचाकी स्वरांचे दैव बलवत्तर होते म्हणून त्यांचे जीव वाचले असा अपघात स्थळी पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे, हायवा गाडीच्या मधोमध दुचाकी गेल्याने कोणी वाचेल असा वाटलं नाही असा प्रत्यक्षदर्शी सांगत होते.

सदर घटनेची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांना मिळताच त्यांनी अपघातग्रस्तांची भेट घेऊन माहिती घेतली असता, मालक रूग्णांना मदत देण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अजिंक्य शेंडे हे आपले कार्यकर्ते सह सरळ संबंधित कोल वासरीच्या कार्यालयात जाऊन अपघातग्रस्तांची आर्थिक परिस्थिती समजून सांगत प्रशासनाला धारेवर धरले व त्यांना आर्थिक मदत करण्यास भाग पाडले. यावेळी योगेश उपरे, यश खामणकर, रुपेश उपरे ,सुजित काळे ,रमेश डाखरे, अक्षय आवारी, प्रीतम राजगडे, नागेश काकडे, हनुमान आवारी, गणेश काळे,विवेक राजगडे, बीटा राजगडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here