मारझोड करून खंडणी मागणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक.
आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल,
वणीत गुन्हेगारी डोके वर काढू पाहत आहे, गुन्ह्यात वाढ, पोलीस प्रशासन सतर्क.
राजू तूरणकर – वणी
सुषमा विजय वाघमारे रा. प्रगतीनगर वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नसून सुद्धा, त्याला वणी शहरातील मुख्य चौकातून गाडी वर बसवून एका शाळेच्या मागे अंधारात नेवून बेदम मारहाण करीत पैसे मागितल्याची गंभीर तक्रार करण्यात आली.
आरोपीने मुलाकडे पैश्याची मागणी केली व मुलाचे खांदयावर हात ठेवून कॉलर पकडुन आमचे सोबत चल नाहीतर तुला किडनॅप करतो म्हणुन मुलास जबरीने गाडीवर बसवून एस. पी.एम. शाळेचे रोडने शाळेचेमागे अंधारात नेले व काही न बोलात हात बुक्यानी मारहान केली व तात्काळ ३०००/-रु मागीतले व दुसरे दिवशी ७०००/- रूघेवुन ये नाहीतर तुला चाकुन मारहाण करतो अशी धमकी दिली व अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली.
यावरून वणी पोलिसांनी युवी मोगरे वय २४ वर्ष साहील मुने वय २५ वर्ष व ईतरा विरुध्द अप. क.११२०/२०२३ कलम १४३, १४७, १४९, २९४,३८६ भा.द.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे स्वरूप व वणी तील वाढती दादागिरी लक्षात घेता वणी पोलीस निरीक्षक अजित जाधव पो.स्टे. वणी यांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले आरोपी युवी मोगरे वय २४ वर्ष व साहील मोगरे वय २५ वर्ष दोन्ही रा. सेवानगर वणी यांना काल तात्काळ अटक करण्यात आली.
सदरची कार्यवाही पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किद्रे उप.वि.पो.अ. वणी. पोलीस निरिक्षक अजित जाधव ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात डी.बी.पथकचे सपोनि / माधव शिंदे, सफौ/ सुदर्शन वानोळे, पोना/ पंकज उंबरकर, पोका / विशाल गेडाम, पोकों / गजानन कुडमेथे यांनी केली आहे.
वणी शहर परिसरात, चोऱ्या, चीडीमारी, मारामाऱ्या, फसवणूक सारख्या गुन्ह्यात प्रचंड मोठी वाढ होताना दिसून येत आहे. पोलीस प्रशासन मात्र हया गुन्ह्यांना आवर घालण्यात कमी पडताना दिसत आहे.