मोहदा दुर्घटना प्रकरणात SIT चौकशीची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांची मागणी.
खदान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – संजय निखाडे.
राजु तुरणकर – वणी.
मोहदा येथे असलेल्या एका खाजगी खदानीत काही दिवसांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत रात्रीच्या वेळी सुमारे ८० फूट खोल खणीत उत्खननासाठी जात असताना प्रोक्लम मशीन अचानक कोसळल्याने एका चालकाचा मृत्यू झाला, या घटनेने खदान धारकाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.
या गंभीर घटनेला काही दिवस उलटूनही अद्याप खदान मालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे जनमानसात तीव्र नाराजी आहे. खदान मालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाण जीवाचा बळी गेला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे, शिवसेना (उबाठा ) गटाच्या वतीने आम्ही मागणी करतो की, या निष्काळजीपणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी आणि खालील मागण्या मान्य करून दोषी खदान मालकावर त्वरित कठोर कारवाई करावीः
१. मोहदा येथील खाजगी खदान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (कलम ३०४ अ. भा.द.वि.) याचन करण्यात यावा.
२. या दुर्घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करण्यान यावी.
३. खदान मालकाला तात्काळ अटक करून कायद्यानुसार कठोर शासन करण्यात यावे. ४. या दुर्घटनेतील मृताच्या वारसांना योग्य आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी.
५. वणी तालुक्यातील इतर खाजगी खदानीच्या सुरक्षा मानकांची तातडीने तपासणी करण्यात यावी आणि
या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषिवर कठोर कारवाई करायी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील आणि मुताच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या घटनेच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास कायदेशीर मार्गाने शिवसेना आंदोलन करेल.