वणीत भीषण अपघात, महीला जागीच ठार.
शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या दुचाकीची कार ला धडक लागून तोल गेल्याने पत्नी खाली पडली व अंगावरून गेला ट्रक.
लोकवाणी जागर वृतांक
पत्नीसोबत दुचाकीवर जात असलेले शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या दुचाकीला ब्राह्मणी फाटा येथे भीषण अपघात झाला. त्यांच्या दुचाकीने उभ्या असलेल्या एका कारला मागून धडक लागल्याने. यात देवराव धांडे हे रस्त्याचे बाजूला पडले तर दुचाकीवर मागे बसलेली त्यांची पत्नी मालन देवराव धांडे ह्या वर्दळीच्या बाजूने रस्त्यावर पडली. दरम्यान निळापूर मार्गे येणाऱ्या कोळशाचा ट्रक मालन धांडे हिच्या अंगावरून गेला. तिचा जागीच मृत्यू झाला. वणी घुग्गुस मार्गावर निळापूर ब्राह्मणी फाटा येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान हा भीषण अपघात घडला.
शेतकरी नेते नेते म्हणून संपूर्ण वन विधानसभा क्षेत्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व देवराव धांडे हे जखमी झाले नाही त्यांना रुग्णालयात पाठविले. मात्र गंभीर ईजा असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. दुचाकीला धडक देऊन कोळसा भरलेला ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढला होता मात्र टोल नाक्या जवळ त्याला पकडण्यात आल्याची माहिती आहे.