माजी आमदार अजुनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाही – संजय देरकर.

0
1554

आमदार संजय देरकर यांच्या डॅशिंग पर्सनॅलिटी चा राजकिय धसका….
देरकरांची कार्यशैली, जनतेत होत आहे लोकाभिमुख..
लालपरी चालवून दिला उपस्थितांना आश्चर्याचा धक्का… पराभवाच्या धक्क्यातून अजुनही ते सावरले नाही – संजय देरकर.

राजु तुरणकर – संपादक.

वणी आगरातील लालपरीचे उद्घाटन प्रसंगी आमदार संजय देरकर यांनी शहरात वर्दळीच्या रस्त्यावर लालपरी बस चालवून नागरिकांचे जीव धोक्यात टाकण्याचा आरोप माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी पदावर असताना देरकर यांनी नियम मोडून एस. टी. चालविण्याची लेखी तक्रार परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तक्रारीनुसार 7 मे 2025 रोजी वणी आगारात नवीन एस. टी. बस लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संजय देरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. उद्घाटन नंतर आमदार देरकर हे एका बसच्या चालक सीटवर बसले व त्यांनी बस सुरु करुन बस स्थानक परिसरातून बाहेर नेली. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर फेरफटका मारुन त्यांनी बस परत बस स्थानक आवारात आणली. विशेष म्हणजे आमदार संजय देरकर यांना यापूर्वी बस चालविण्याचा कोणताही अनुभव, परवाना किंवा परिवहन विभागाचा बॅच व बिल्ला नसताना त्यांनी वर्दळीच्या व रहदारीच्या मार्गावर बस चालविण्याचे धाडस केला.

हाच तो बस चालविण्याच्या चर्चित व्हिडिओ ….

संजय देरकर यांची महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाकडे चालक म्हणुन नियुक्ती नाही. त्यांच्याकडे आरटीओ या सक्षम अधिकाऱ्यांचे बस चालविण्याचा बॅच बिल्ला नाही. जड वाहन चालक म्हणुन आवश्यक असणारे लायसन्स नसताना वणी शहरातून बस चालविली. सरकारी व सार्वजनिक वापराचे वाहन चालविणे ही गंभीर बाब असून त्यांच्याकडे बस चालविण्याचा कोणताही अनुभव व परवाना नाही. दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते. महामंडळाने संबंधीत प्रकरणाची चौकशी करुन अनुभव नसतांना एसटी बस चालविण्यास देणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

नवीन एस. टी. बस लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रात्यक्षिक [test drive] म्हणून मी बस चालवून पाहली. चालवणे आणि चालवून पाहणे यात फरक आहे, त्यामुळं मी काही चुकीचे केलें असे मला वाटत नाही. यापूर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री व इतर काही ठिकाणी नवीन बस उद्घाटन प्रसंगी आमदारांनी बसेस चालवली. यात वणी आगार प्रबंधकाचा काहीही दोष नाही. माजी आमदाराना अद्यापही त्यांचा पराभव पचनी पडत नाहीय. त्यामुळे उठले सुटले काहीही तक्रार करण्याची त्यांची सवयी झाली आहे.

संजय देरकर – आमदार, वणी विधानसभा.

संजय दरेकर हे प्रदीर्घ राजकीय अनुभवातून निवडून आले आहे. जनतेच्या मनातील भाव ओळखण्यात ते महिर आहे. बंद पडलेली एसटी पाहून थांबून प्रवाशांना धीर देणे, सरकारी दवाखान्यात अचानक भेट देऊन  विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य गरीब लोकांना आरोग्य सेवा मिळते की नाही म्हणून बरोबर लक्ष ठेवून  लोकांना अचंबित पाडणारे,  मराठी मुलांना ओबी कंपन्यात नोकरी मिळाव्या म्हणून सातत्याने रेटा लावून ओबी कंपन्यांना जेरीस आणणारा नेता, घोंसा कंपनीत अनेक वर्षापासून काम करणाऱ्या मुलांना डबल पगार वाढवून देणारे, कळमना येथील मुलांना कोलवॉशरीत कंपनी 70 मुलांना घरबसल्या पगार देणारे. मोहदा गावातील ओव्हरलोड आणि गावातून यणाऱ्या समस्यांसाठी परिवहन महामंडळाकडे सतत रेटा लावणारे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून त्या सोडून घेण्याची सातत्याने धडपड करण्याचा प्रयत्न, यामुळे अधिकारी वर्गात संजय भाऊ देरकराप्रती अतिशय सन्मान निर्माण झाला असून जनमानसात मिसळून काम करण्याचा कार्यशैलीमुळे ते लोकप्रिय होत चालले आहे. त्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय धासती घेतल्याचे पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here