घरकूल बांधकाम धारकांसाठी मोठा दिलासा, वाळूचा मार्ग मोकळा,आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्याला यश.
जिल्हाधकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत ला सरळ वाळू उपलब्ध करून देण्याचेआदेश – आमदार संजय देरकर.
राजु तुरणकर – संपादक.
यवतमाळ (प्रतिनिधी) – घरकुल धारकांना शासनमान्य ५ ब्रास वाळू तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून वाळू प्रश्नावर तोडगा काढला आहे. या चर्चेच्या माध्यमातून अनेक गरजू लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
आज दुपारी ४.०० वाजता आमदार संजय देरकर यांच्या घरी तालुक्यातील घरकुल लाभार्थी महिला व पुरुषांनी आमदार यांना घेराव घातला व घरकुलासाठी वाळूची मागणी केली. यावेळी आमदार देरकर यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याशी फोनवर चर्चा केली.
या चर्चेत त्यांनी घरकुलासाठी लागणारी वाळू तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, ज्या ग्रामपंचायती वाळू वाहतुकीस सक्षम आहेत, त्यांनी तहसीलदार कार्यालयात तत्काळ अर्ज करावा. अशा ग्रामपंचायतींना वाहतुकीसाठी आवश्यक ती परवानगी देण्यात येईल.
या निर्णयामुळे घरकुल बांधकामासाठी वाळू मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लाभार्थ्यांना वेळेत घरकुल पूर्ण करता येईल. आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे वाळू प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, सुधीर थेरे, इंजी. कुंडलिक ठावरी, अनिल देरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
सक्षम ग्राम पंचायतींनी वाळूसाठी गुरुवारला तहसील कार्यालयात हजर राहावे – आ. संजय देरकर यांचे आवाहन.
वणी विधानसभेतील सर्व घरकुल बांधकाम धारकांना लागणाऱ्या वाळूसाठी वाळूची वाहतूक करणाऱ्या सक्षम ग्राम पंचायतींनी आपापल्या लाभार्थ्यांची यादी व ग्राम पंचायतीच्या लेटर पॅडवर मागणी पत्र घेऊन घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन तारीख १५ मे रोजी गुरुवारला सकाळी ११. वाजता आपापल्या वणी, मारेगाव, झरि जामनी तहसील कार्यालयात आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे.