जनता विद्यालयाची यशाची परंपरा कायम ,कु. अनुराधा महालक्ष्मे तालुक्यातून प्रथम.

0
194

जनता विद्यालय वणीचे घवघवीत यश, यशाची परंपरा कायम……कु. अनुराधा अरविंद महालक्ष्मे 98.20% वणी, झरी, मारेगाव या तीनही तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त.

कु. अनुराधा अरविंद महालक्ष्मे, यश राजू कावडे, ओम संतोष पानघाटे या विद्यार्थ्यांनी संस्कृत या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त.

राजु तुरणकर – संपादक.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये जनता विद्यालय वणी चा निकाल 87.67% लागला असून या परीक्षेला बसलेले विद्यार्थी 349 त्यापैकी प्रथम श्रेणीत 110 द्वितीय श्रेणीत 144 तृतीय 52 अनुत्तीर्ण 43 झालेले आहेत. विद्यालयातून व वणी, झरी, मारेगाव तालुक्यातून कु. अनुराधा अरविंद महालक्ष्मे 98.20% गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयातून द्वितीय क्रमांक यश राजू कावडे 95.80% तृतीय क्रमांक ओम संतोष पानघाटे 93.80% चतुर्थ क्रमांक कु.शिवाणी निर्दोष ठेंगणे 91.80% कु.वैदही शंकर सोयाम 89.40% कु. स्वाती नानाजी वासेकर 89.40% कु.विद्या विनोद रहाटे 89.00% साईप्रसाद हर्षवर्धन सूर 87.80%कु. आस्था सुनील गौरकर 86.40% कु.स्नेहल चंद्रशेखर पाचभाई 86.40% कु.मानसी विठ्ठल झाडे 85.80% कु.सृष्टी वसंता थेटे 85.20% गुण प्राप्त केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई अशोकराव जीवतोडे, सचिव, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ.श्री. अशोकराव जीवतोडे, उपाध्यक्ष श्री. अंबरजी अशोकराव जीवतोडे यांनी केले. विद्यार्थी या यशाचे श्रेय शिक्षक तथा पालकांना देत आहेत. विद्यालयच्या मुख्याध्यापिका, सौ. मंगला जोगी उपमुख्याध्यापक श्री. गुलाब भोयर पर्यवेक्षक श्री. उत्तम हांडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन भरभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here