घरकूल बांधकाम धारकांना रेती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

0
257

खुश खबर :- घरकूल लाभार्थ्यांसाठी वणी तालुक्यात वाळू वाटपास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी… आमदार संजय देरकर यांच्या प्रयत्नांना यश.

गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा; यासाठी ४२३० ब्रास वाळूचे वाटप होणार…

राजु तुरणकर वणी , दि. १९ मे २०२५ –
महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५ अंतर्गत वणी तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी सुमारे ४२३० ब्रास वाळू स्थानिक लाभार्थ्यांसाठी वाटपास मंजुरी दिली आहे. घरकुलाच्या वाळूसाठी आमदार संजय देरकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे घरकुल धारकांनी समाधान व्यक्त करित आहे.

या निर्णयानुसार, शासनाच्या ८ एप्रिल व ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयांनुसार पात्र लाभार्थ्यांना कमाल ५ ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही. तहसिल कार्यालय ऑनलाईन पास तयार करून देईल आणि संबंधित ग्रामसेवकांमार्फत ही वाळू थेट घरपोच पोहोचवली जाईल.

यामध्ये केवळ पर्यावरणीय मंजुरी मिळालेल्या आणि लिलाव न झालेल्या वाळूगटांमधूनच वाळू दिली जाणार आहे. स्थानिक नागरिकांनी वैयक्तिक घरबांधणीसाठी वाळूची मागणी केल्यास, ₹६०० प्रति ब्रास दराने आणि इतर अनुज्ञेय शुल्क भरून ऑनलाईन पास द्वारे वाळू उपलब्ध होणार आहे.

तहसिलदार व गट विकास अधिकारी यांच्यावर संपूर्ण कार्यवाहीची संयुक्त जबाबदारी राहणार आहे. या निर्णयामुळे घरकुलासाठी वाळूची टंचाई दूर होणार असून, गरजू कुटुंबांना त्यांच्या घराच्या उभारणीसाठी हक्काची मदत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here