तहसीलदार वणी यांच्या जप्तीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह ?…..
तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबीत करा – अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा..
राजु तुरणकर – संपादक.
तालुक्यातील नायगाव (झोला) शिवारात करोडो रुपयांचा शासनाचा महसूल खनिज संपत्ती अवैधरीत्या उपसा करून चोरीला गेला. त्यात मशीन मालकावर गुन्हा दाखल न करता थातुरमातुर कारवाई केली. अशातच वणी तहसील प्रशासनाने संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावरही कारवाई केली नाही. याप्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूलमंत्र्यांकडे निवेदनातून केली.
वणीचे तहसीलदार निखील धुळधर यांनी ६ एप्रिल रात्री दुपारी झोला या गावाजवळील
वर्धा नदीवरील घाटावर धाड मारली. त्या कारवाईत एक हायवा ट्रक, जेसीबी कंपनीचे पोकलॅन्ड मशीन जप्त केले. या घाटांवरून रेतीचा उपसा करून कोट्यवधींचा महसूल चोरीला गेला. परंतू त्या नायगाव (झोला) भागाचे मंडळ अधिकारी जयंता झाडे व तलाठी कुणाल आडे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. तसेच आतापर्यंत फक्त तहसीलदारच थातूरमातूर कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी यावेळी दिला.