दुःखद वार्ता….
काळाचा घाला….
प्रसिध्द व्यक्तिमत्त्व दिलीप कोरपेनवार सर यांचे अपघाती निधन…
संपूर्ण वणी शहरात दुःखाचे सावट….
वणी वरुन नागभिडला जात असताना वरोरा समोर चिमूर रोड वर आज सकाळी पिकअप गाडीला पेट्रोल टँकरने जबर धडक दिल्याने वणी नगर परिषद शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक व वणीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते दिलीप नारयनराव कोरपेनवार सर यांच अपघात स्थळीच निधन झालं ते 57 वर्षाचे होते.
नगरसेवा समितीची स्थापना करून मागील पंधरा वर्षापासून दर रविवारला साईबाबा मंदिर ते नांदेपेरा रोड परिसरात स्वच्छता अभियान राबविणे,संपूर्ण वणी शहरात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य कपडे खाऊ वाटप ,सणावाराला भोजन व्यवस्था करणे हे सारं करत असताना कुठेही प्रसिद्धी माध्यम किंवा आपल्याला पुरस्कार मिळावा अशी मनात कुठेही भावनांना न ठेवता, निस्वार्थ सेवा भाव हा काम करण्याचा त्यांचा स्वभाव, यामुळे त्यांनी लोकांच्या हृदयामध्ये फार मोठी जागा निर्माण केली होती.
त्यांच्याही अपघाती निधनामुळे संपूर्ण वणी शहरामध्ये व कोरपेनवार परिवाराती शोककळा पसरली असून, दुःखाचे सावट पसरले आहे.
वरोरा येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम प्रक्रिया सुरू आहे…
लोकवाणी जागर परिवार व नगर सेवा समितीच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.