प्रख्यात प्रबोधनकार, कीर्तनकार इंदुरीकर महाराज वणीत.
रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता. प्रा. टिकाराम कोंगरे यांचे आयोजन.
राजू तूरणकर _संपादक.
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार, प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचा ३ नोव्हेंबरला वणी येथील शासकीय मैदानावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), Bsc B. Ed उच्च विद्याविभूषित शिक्षण असलेले महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे, चालू राजकीय घडामोडींवर कडाडून टीका करणे, विनोदी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसविने, प्रेरणादायी विचार मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याने ते समाजातील सर्वच घटकात अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका इरिगेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने हभप इंदोरीकर महाराजांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नोव्हेंबरला 3 दुपारी ३ ते ७ या वेळेत हा ” कार्यक्रम वणी येथील शासकीय मैदान (पाण्याची टाकी) येथे होणार आहे. तसेच याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धनोजे कुणबी सभागृहात पालखीसुद्धा काढण्यात येईल. नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.