शिवसेना वणी शहर कडून मुख्याधिकाऱ्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम.

0
820

वणी शहरातील मुख्य नागरी समस्या तात्काळ दूर न केल्यास धरणे आंदोलनाचा इशारा…

शिवसेनेचा सात दिवसांचा अल्टिमेटम, संपुर्ण शहरात  समस्यांच्या डोंगर, मुख्याधिकारी वणी यांचेवर हलगर्जीपणाचा आरोप, नागरिकांच्या आरोग्यासी खेळखंडोबा.

राजु तुरणकर – संपादक.

वणी शहरातील काही तातडीच्या नागरी समस्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय नीखाडे यांचे प्रमुख उपस्थितीत शहर प्रमुख विनोद ढुमणे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांच्या निदर्शनास आणून देत नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात आणून देत सदर समस्यावर तात्काळ कार्यवाही करणे संदर्भात शिष्टमंडळ घेउन चर्चा कऱण्यात आली.

संपुर्ण वणी शहरात वीज, स्टोरेज क्षमता, भरपूर पाणी ऊपलब्ध असताना सुद्धा शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे आपले विभागाला अलर्ट करून संपुर्ण शहराला तात्काळ पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे, इंदिरा गांधी चौक ते अग्रवाल कंट्रोल यांच्या  घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे कामाची सुरुवात करावी, इंदिरा गांधी चौक परिसरातील खुल्या नालीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे.शहरातील साई मंदीर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्ता दुभाजकात अती मोठी होणारी झाडे लावण्यात आली आहे, जी मोठे झाल्यानंतर एस टी बस, जड वाहतुकीची मोठी वाहने झाडांच्या फांद्या रस्त्यांवर आल्याने अपघाताचे कारण ठरू शकते अशी नियमबाह्य झाडे दुभाजकातून तात्काळ काढून त्या ठिकाणी निविदेतील नमूद झाडे लावण्या संदर्भात चर्चा कऱण्यात आली.हमीद चौक ते पंचशील चौक या दरम्यानचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तसेच ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेजवळ पाणी साचलेले असून शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात वरदळी साठी त्रास सहन करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
दर रविवारी भरणारा आठवडी बाजार नियोजित जागेवर न भरता रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण केली जाते त्यामूळे तो नियमित जागेवर भरविण्यात यावा. तसेच संपूर्ण शहरांमध्ये कीटकनाशक फवारणी करून मच्छर मुक्ती अभियान राबविण्याची मागणी कऱण्यात आली, या संपूर्ण प्रश्नांची सरबत्ती भडिमार मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांच्यावर करण्यात आला वरील सर्व गंभीर बाबींवर तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही सात दिवसाच्या आत करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा नगर परिषद आवारात धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे , जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकर, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश कराड, उप तालुका प्रमुख लुकेश्वर बोबडे, शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर संपर्कप्रमुख राजू तुराणकर,  शहर संघटक मनीष बत्रा, अजय चन्ने शहर सचिव, उपशहर प्रमुख राजीव पाटील, राहुल कोलते, आनंद घोटेकर, प्रसिद्ध प्रमुख सांकेत भुजबळ, प्रेमा धानोकर उपसरपंच भांडेवाडा, राजु इड्डे तालुका सचिव , अरविंद राजूरकर उपतालुका प्रमुख, सुभाष कुमरे, विजय ठाकरे, राजू झाडे , भारत डंबारे ,यादव आसुटकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here