वणी पोलिसांवर गंभीर आरोप.

0
1826

वणी पोलिसांवर गंभीर आरोप. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन.
आमदार, खासदारांना फोन केल्यास गांजा तस्करीच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी.
पोलिसांचा मानसिकतेवर  प्रश्नचिन्ह……

राजकीय स्टंट आखून करवाई केली असा बनाव करीत राजु तुरणकर यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचा डाव….

राजु तुरणकर – संपादक.

31ऑगस्ट चे सायंकाळी 8 वाजे दरम्यान विराणी टॉकीज समोरील काळे यांच्या दवाखान्याकडून जैन लेआऊट कडे जात असताना मधात पडणाऱ्या लेआऊट मधील एका कॉर्नरवर सहज उभे असलेल्या दोन तरुण पल्सर-200 बाईकवर रेसिंग करताना आढळले असा खोटा बनाव करून वणी पोलीसांनी आपल्या खाकी वर्दीला कलंक लावणारे वर्तन करित गुन्हे दाखल केल्याने पालक धनराज येसेकर यांनी वणी पोलिसांवर नाव विचारून बिद्धीपुरकर हेकेकोरीने दंडात्मक कारवाई केलाचा गंभीर आरोप करीत लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी वणी यांचे कडे करून न्याय देण्याची मागणी केल्याने परिसरातील तरुणांमध्ये पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

पोलीस पथकाने दोन्ही बाईक ताब्यात घेऊन कागदपत्र तपासणी केली असता दोन्ही चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रे आढळले नाही. त्यामुळे पोलिसाने चालक सतीश रामदास हिवरकर, रा. छोरिया ले-आऊट चालवत असलेली MH29 CL1790 व सुखदेव सुनील भोयर रा. छोरिया ले-आऊट च्या ताब्यातील MH29 CG8758 या दोन पल्सर 200 बाईक जप्त केली. अशी प्रेस नोट (प्रसिध्दी पत्रक काढून) रेसिंग बाईक स्वरावर कारवाई केली असे जाहिर केले.

आमदार खासदारांना फोन केले तर असे म्हणत धमकी ..

महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” आहे, ज्याचा अर्थ “चांगल्यांचे संरक्षण करणे आणि वाईटाचा नाश करणे” असा होतो. हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलीस दल सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दर्शवते. परंतू कारवाई करणारे पोलीसांनी कारवाई करतांना आमदार खासदारांना फोन केल्यास गंभीर गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली, असे शब्द प्रयोग करून आपल्या खाकी वर्दीतील गुंड प्रवृत्तीचे दर्शन दिले आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याचा दबदबा व वावर….

पोलिसांकडून चांगल्यांचे संरक्षण वाईटाचा नाश हे कर्म जनतेला अभिप्रेत असताना, वणी पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी,  उभ्या गाडीला सर्व कागदपत्रे ओके असताना बुद्धी पुरस्कार केलेली कारवाई ही काही… पोलीस कर्मचाऱ्यांची मानसिकता निश्चित करते. माञ वणी पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी वणी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या इसामा सोबत उठबठ करतांना, त्यांच्या गाड्या मधे फिरताना तर त्यांचे विशेष अतिथी म्हणून वावरत असतात हे विशेष… वणी पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आपलेच अधिकारि यांचेवर पाळत ठेवण्यासाठी काही फनटर पोट्टे  मानधनावर पोसून, पोलीस ठाण्यातील हालचालींवर नजर ठेवून असतात. व होणाऱ्या घडामोडींची सर्व माहिती पोहचविण्याचे काम करीत असतात… आता हे सर्व प्रकार वणी कर जनतेला कळून चुकले आहे.

राजु तुरणकर यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याच्या डाव असफल …

बाईकवर बसून असलेल्या मुलांवर करवाई झाल्यावर हे त्यांच्या पालकासह पोलीस ठाण्यात गेले असता हि करवाई राजु तुरणकर यांनी पोलीसांना सांगून केली असावी अशी शंका नाव न सांगण्याच्या अटीवर पालकांनी प्रत्यक्ष भेटून बोलून दाखवली…

धनराज येसेकर हे राजु तुरणकर यांना प्रत्यक्ष भेटून भाऊ काही चुकले असेल तर माफ करा परंतू मुलाला असे फसवू नका असे बोलल्यानंतर राजु तुरणकर यांनी संपुर्ण घटनाक्रम ऐकून घेतला या घटनेसी माझा काही संबंध नसल्याचे सांगून त्यांचा गैरसमज दूर केला. एकंदरीत पोलीस कारवाईच्या अनुषंगाने राजु तुरणकर धनराज येसेकर यांच्यात भांडणे लावण्याचा काही  लोकांचा डाव असफल ठरला.

राजु तुरणकर ला वणी पोलिसांचे असहकार्याचे धोरण.. 29 एप्रिल 2023 चे मध्यरात्री राजु तुरणकर यांची बोलेरो घरासमोर पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यात आली. सदर घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला.तपासीय अधिकारी दत्ता पेंडकर यांनी  चौकशी आटोपवत कोणताही ठोस पुरावे न मिळाल्याचे कारण देत फाईल बंद करून टाकली… ही माहिती अधिकारातून काढल्यानंतर पुन्हा नव्याने संशयित आरोपीच्या नावा सहित चौकशीचा अर्ज केल्याने न्यायालयाला पुन्हा नव्याने परवानगी मागत चौकशी सुरु केली आहे. ज्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये संशयित आरोपी दिसून येत आहे , त्याचे सीडीआर नंबर आता दोनवर्षानंतर घेण्यात नविन तपासिय अधिकाऱ्यांनी घेतला आणि ते फॉरेन्सिक ला पाठवून तपास करीत आहेत.माञ प्रथम तपासीय अधिकारि यांनी हे सौजन्य दाखविले नव्हते. पोलीस प्रशासनात चांगलेही कर्मचारी आहेत याचा अर्थ संपूर्ण प्रशासनाचा विरोध नाही तर त्या प्रशासनात राहून प्रशासनाच्या आड स्वहित साध्य करणाऱ्यांचा तो विरोध आहे.मात्र … राजु तुरणकर हे पोलिसांचे हितचिंतक नाहीं ते आपले विरोधात लिहितात, अशी काही मंडळी बोलतात. पण माझे आजही तेच विचार कायम आहे, खऱ्याला खर आणी खोट्याला खोट म्हटल्या मुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते होणारच सत्य हे लिहिले जाणारच…. एकंदरीत माझ्यावर झालेला अन्यायाचा आरोपीचा शोध घेण्यास पोलीस असमर्थता दाखवीत असेल तर ते मी सांगीतले म्हणुन करवाई करतील हे कोडच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here