वणी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित व्यक्तिमत्त्वांचा शिवसेनेत प्रवेश.

0
992

वणी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित व्यक्तिमत्त्वांचा शिवसेनेत प्रवेश.

आमदार संजय देरकर यांच्या पाठीशी उभे राहून सहकार क्षेत्रात संघटनात्मक बांधणी करणार…

राजु तुरणकर – संपादक.

वणी तालुक्यातील सहकार व ग्रामविकास क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर विश्वास दाखवत जाहीर प्रवेश केला. वणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष गणपत रासेकर व उमरी ग्रामविकास सहकार संस्थेचे अध्यक्ष विलास गोसावी पिदुरकर यांनी दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला मोठे बळ दिले.

हा  पक्षप्रवेश सोहळा आमदार मा. संजय देरकर व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी समन्वयक सुधीर थेरे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, डॉ. विलास बोबडे, सतीश वऱ्हाठे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणपत रासेकर व विलास गोसावी पिदुरकर यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करताना सहकार क्षेत्रात ठसा उमटवला आहे. शेतकरी कल्याण, ग्रामविकास व सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे फक्त संघटनात्मकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही शिवसेनेला बळकटी मिळणार आहे.

या प्रवेशामुळे वणी तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक सबळ झाली आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणात बदल होऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पकड आणखी मजबूत होईल. अलीकडेच झालेल्या अनेक पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.

आमदार संजय देरकर यांचे नेतृत्व ठळकपणे अधोरेखित…

आमदार संजय देरकर हे ग्रामीण भागाशी सातत्याने संपर्कात राहून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. स्थानिक समस्यांबाबत त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि कार्यपद्धती यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास बसला आहे. पूर्वीच्या आमदारांना जमले नाही ते काम देरकर यांनी करून दाखवतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष…

या प्रवेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे बळ वाढले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेना विजयाची नांदी ठरवेल, असा विश्वास जनतेच्या मनामध्ये दृढ झाला आहे.वणी तालुक्यातील ग्रामीण जनतेचा विश्वास, सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे समर्थन आणि आमदार संजय देरकर यांचे प्रभावी नेतृत्व – या त्रिसूत्रीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अधिक जोमाने पुढे जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here