निंबाळा येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश.
संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा प्रवेश, तरुण वर्गात नवचैतन्य.
राजू तूरणकर
महाराष्ट्र राज्यातील राजकीय परिस्थिती बघता शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे सध्या शिवसैनिक द्विधा अवस्थेत आहे. परंतु उद्धव साहेबांच्या एक वचनी धोरणावर अनेक युवक प्रेरित झाले असून सध्या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वांना परिचित असलेले नेतृत्व, ज्यांची जनमानसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पकड आहे असे संजय देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निंबाळा येथिल नागरिकांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे,युवासेना समन्वयक समीर लेंनगुडे,व विनोद दुमने संजय देठे भगवान मोहिते आकाश आसुटकर यांचा उपस्थित भव्य प्रवेश सोहळा पाड पडला.
निंबाळा येथील संदीप गोहणे,राजेंद्र कोसरे, बाळा ठासळे, कान्हू कोहळे, संदीप मुसळे, गणेश झाडे, संतोष मुक्के, अनिल गेडाम ,मारोती नैताम व इतर गावातील नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी अजिंक्य शेंडे यांनी शहरातील आरोग्य व शासकीय कामात अडचण आल्या तर संपर्क साधण्याचे आवाहन केले.