राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबा सोबत साजरी केली दिवाळी.
राजू तुराणकर– संपादक.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा क्षेत्रा तर्फे सामाजिक न्याय विभाग, जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे यांच्या नेतृत्वात सामाजिक भान जोपासत वणी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबा सोबत दिवाळीचा फराळ, मिठाई, महिलांना साडी, चोळी, व मानधन देऊन मागील वर्षात आठ ते दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सर्व गावला जाऊन घरी भेट देऊन दिवाळी साजरी करीत मायेच्या आधार दिला.
या वेळी जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे, खुशाल बासमवार, विनोद ठेंगणे, गुणवंत टोंगे, रामकृष्ण वैद्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.