संजय खाडे अध्यक्ष, रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोडुसर कंपनी, नागपुर येथे सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित.
राजू तूरणकर –संपादक.
रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोडुसर कंपनी लिमिटेड वणी च्या वतिने अध्यक्ष संजय रामचंद्र खाडे यांना नागपुर येथे सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यापकोच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्त्याने पारितोषिक वितरण समारोह कार्यक्रमात विदर्भ ॲग्रीकल्चरल अँड अलाईड प्रोडुसर कंपनी नागपुर (व्यापको) किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा रब्बी हंगाम २०२३ या हंगामाकरिता हा सन्मान चना खरेदी दरम्यान कंपनीचे उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल व खरेदी केंद्रावर शेतक-यांची कसलिही गैरसोय न होवू देता तात्काळ त्यांच्या खात्यावर पैसे मिळवून दिल्याबद्दल तसेच मोठया प्रमाणात चना खरेदी करून दिल्याबद्दल वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती परिसर, नागपुर येथे सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा, व्याख्याते चंद्रशेखर भडसावळे, श्रीकांत कुवळेकर, प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र साबळे विभागीय कृषी सहसंचालक नागपुर, डॉ. अर्चना कडू प्रकलप संचालक (आत्मा) नागपुर, श्रीमती प्रज्ञा गोळघाटे नोडल अधिकारी, विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, रविद्र मनोहरे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नागपुर, एम.बी. ढवळे उपसंचालक रेशीम संचालनालय नागपुर व्यापको कंपनीचे संचालक राजेश उरकुडे, धनंजय उरकुडे व कंपनीचे संचालक ईश्वर खाडे आदि उपस्थित होते.
आपला