वर्ल्ड कप लाईव्ह चा राजकीय धिंगाणा चौकात कश्यासाठी.बदलते राजकारण आणि भरकटत चाललेली तरुणाई ….
शहराच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी…..
बेजबाबदार नेतृत्व की पैशांची उधळपट्टी..
राजू तूरणकर–संपादक.
आधुनिक काळात होत असलेल्या बदलाबरोबर वाहत न जाता त्यातले बरेवाईटपण पाहून समाजासाठी आवश्यतेनुसार राजकीय पुढाऱ्यांनी समाजासमोर आदर्श ठरले अशी कृती, वागणूक केली पाहिजे. मुख्य म्हणजे आज सोशियाल मीडिया , इलेक्ट्रॉनिक मीडिया स्ट्रॉंग झाली आहे. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले आहे. प्रत्येक घरी टीव्ही आली आहे. या सर्व माध्यमावर वर्ल्ड कप लाइव्ह प्रक्षेपण असताना हा चौकामध्ये राजकीय गोंधळ कशासाठी, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
लाईव्ह प्रक्षेपणामुळे चौकात उभी राहणारी तरुणाई, निर्माण होणारा गोंधळ, वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे, याला शासकीय परवानगी आहे काय? या राजकीय पक्षांच्या प्रक्षेपणामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न हे निरुत्तरीत आहे. समाजाला काय संदेश देवू इच्छिता हे मात्र नक्की कोडच आहे.
आपण बहुसंख्येने दुर्वर्तनी तसेच बेशिस्त असलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या समाजाचे नेते आहोत, अशा या (दुर्वर्तनी, बेशिस्त आणि बेजबाबदार) समाजाला जबाबदारी, शिस्त आणि सद्वर्तनाचे धडे शिकवणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे. नेतृत्व म्हणजे राजकारण, सरकार आणि प्रशासन, समाजकारण, साहित्य, मिडिया अशा क्षेत्रातील निवडक धुरंदर! मात्र हेच धुरंदर नेतृत्व बहुसंख्येने कसे बेताल वर्तन आणि व्यवहार करते याचे दर्शन निमित्ताने घडताना दिसत आहे. असा धिंगाणा चौकात घालण्यासाठी परवानगी देणारे शासक जितके बेजाबबदार तितकेच त्या बातम्या उगाळून उगाळून रंगवणारा मिडियाही बेजबाबदार आणि बेताल आहे.
तरुणाई चौकात उभी करून गोंधळ घालून सशक्त समाज उभा होणार नाही. वैचारिकदृष्ट्या ही बाब सामाजिक शांतता भंग करणारी असून. पक्षांनी असे उपक्रम पब्लिक प्लेस वर नको तर एखाद्या लॉन वर आयोजित करून आपल्या कार्यकर्त्यांची जेवनखावणाची व्यवस्था करावी व जनसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासा पासून मुक्ती द्यावी. व जनतेला शुभ संदेश द्यावा हिच या यानिमित्ताने लोकवाणी जागरच्या माध्यमातून जनसामान्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. कोणाला किती फायदा होणार मात्र अनेकांना त्रास जरूर होणार हेच सत्य जनमानसांसमोर सत्य ठेवण्याचा प्रयत्न आहे.