जाबाच अधिकाऱ्यांच्या जिगरबाज कारवाईमुळे वाचले तीस मुक्या जनावरांचे प्राण.

0
457

कत्तलीसाठी नेणाऱ्या गाई पुन्हा पकडल्या, डीबी पथकाची कारवाई, रोजच नेतात तेलंगणात बिफसाठी मुके जनावरे.

जाबाज अधिकारांच्या जिगरबाज कारवाई मुळे वाचले तीस मुक्या जनावरांचे प्राण. गो तस्करी करणाऱ्यांचे दणाणले धाबे.

स्थानिक नागरिक सांगतात रोजच नेतात गाई…. हा मार्गच गो तस्करीचा.

राजू तूरणकर–वणी

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने सोमवारी दोन ठिकाणी कारवाई करून गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या. मुकुटबन ते येडसी तसेच मांगली चौफुलीवर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तस्करांच्या तावडीतून 30 गोवंश जनावरांची सुटका केली. जनावराना तेलंगणात घेऊन जाणाऱ्या 8 तस्करांना पोलिसांनी अटक केली.

मुकुटबन मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीकरीता प्रतिबंधित गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. खात्रीलायक माहिती घेऊन पथकाने सोमवारी पहाटे मुकुटबन येडसी मार्गावर पिकअप वाहन क्रमांक TS- 10 UB – 8687 मध्ये निर्दयीपणे कोंबून असलेले 13 जनावरे तसेच मांगली येथे कळपाने पायदळ जाणारे 17 बैलाची सुटका केली.

पोलीस पथकाने येडसी मार्गावर केलेल्या कार्यवाहीत फयाम गफ्फार शेख रा. मुकुटबन, सद्दाम महमूद रा. चिखलवर्धा, संदीप सोयाम, राजू सोयाम दोघं रा. पिंप्रडवाडी या तस्करांना अटक केली. तर मांगली येथे कारवाईत सचिन थेरे, देविदास भोस्कर, रमेश पेन्दोर, शत्रूघन घोरफळे या चौघांना गोवंश तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. दोन्ही कारवाईमध्ये पथकाने सुटका केलेले 30 जनावरे व पिकअप वाहनासह 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपी विरुद्ध मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्था.गुन्हा शाखेचे API अतुल मोहनकर, API अमोल मुडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, चालक सतीश फुके यांनी मिळालेल्या माहिती ची  गंभीर दखल घेत, पाळत ठेवून जिवावर बेतून ही जिगरबाज कारवाई केल्यामुळे गोतस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here