श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त गरजवंताना ब्ल्यांकेटचे वाटप

0
267

श्री संत गाडगे बाबा स्मृतिदिना निमित्ताने ब्ल्यांकेट चे वाटप.

थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या निराधार लोकांना नगर सेवा समितीने दिली मायेची उब.

आनंद नक्षणे –लोकवाणी जागर.

श्री संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाच्या औचित्याने कडाक्याच्या थंडीमध्ये निवारा नसल्यामुळे रस्त्यावर मिळेल तिथे अंथरून पांघरून झोपणाऱ्या निराधार लोकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेटचे (करम कपड्याचे) वाटप नगर सेवा समितीच्या वतीने आज १९ डिसेंबर २३ रोजी रात्री करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका समोरील इमारती पासून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरात फिरून, बस स्टँड परिसर, शिवतीर्थावरील नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोर परिसर, महावीर भवन जवळ गांधी चौक परिसर, रंगनाथ स्वामी मंदिर परिसर हनुमान मंदिर या परिसरात व ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना व गरजवंतांना ब्लॅंकेट चे वाटप वणीचे दानशूर विजय चोरडिया यांच्या सौजन्याने करण्यात आले.

मागील बारा वर्षापासून दर रविवारी स्वच्छता अभियान, ब्लॅंकेट चे वाटप , अपंग लोकांना काठी वाटप, संपूर्ण शहरांमध्ये झाडे लावणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असते त्यापैकी आज श्री संत गाडगे बाबा यांच्या स्मृिदिनानिमित्त ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगर सेवा समितीचे नामदेवराव शेलवडे, दिनकरराव ढवस, दिलीप कोरपेनवार, राजू तुरणकर, सागर मुने, विकास जयपूरकर, प्रदीप मुके, सागर जाधव, भास्कर पत्रकार, नितीन बिहारी, पुंडलिक मत्ते इत्यादी हजर होते.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here