- जनता विद्यालय, वणी येथे 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे उद्घाटन संपन्न.
राजू तुरणकर–संपादक लोकवाणी जागर.
26 डिसेंबर 2023 ला पंचायत समिती वणी तथा जनता विद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने 51 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2023 -24 उद्घाटन सोहळा थाटात पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षा एम. डी.जोगी मुख्याध्यापिका, जनता विद्यालय वणी यांनी भूषविले उद्घाटक म्हणून सुरेशजी बरडे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जनता विद्यालय वणी यांनी भुषविले . प्रमुख अतिथी म्हणून स्नेहदीप काटकर साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वणी तसेच निकोले सर, चिडे सर ,जांभुळकर सर ,कोवे सर, वाटेकर मॅडम ,काळे मॅडम ,वासेकर मॅडम , बोबडे सर , आसुटकर सर हे सर्व उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी मुलांनी शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून पुढे आपले भविष्य उज्वल करावे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपले अस्तित्व बाधित ठेवावे. अशा प्रकारचा सल्ला दिला मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच विज्ञानाच्या विषयी आवड निर्माण व्हावी नवीन संकल्पना त्यांना सुचाव्यात, या दृष्टिकोनातून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले जातात असे मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्याला बहुतांश शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन मत्ते सरांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक वृंदानी सहकार्य केले.