प्रशांत नांदे यांना पितृशोक.
अजाब राव नांदे यांचे वृद्धापकाळाने निधन.
आनंद नक्षने–मारेगाव
मारेगाव भाजपचे तालुका महामंत्री, नगरपंचायत माजी उपाध्यक्ष, धोबी परिट महासंघाचे मारेगाव तालुका अध्यक्ष प्रशांत नांदे यांचे वडील श्री. अजाब राव नांदे यांचे आज पहाटे 2 वाजता मारेगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले, ते 80 वर्षाचे होते.
शांत,संयमी, कमी बोलण्याच्या त्यांचा स्वभाव असल्याने त्यांनी संपूर्ण मारेगावात परिचित लोकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, जावई, नातवंड बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचा पार्थिवावर अंतिम संस्कार आज दुपारी 12 वाजता मारेगाव मोक्षधाम मध्ये करण्यात येईल.
लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली