संजय खाडे कापूस पणन महासंघाच्या निवडणुकीत विजयी.
अभिनंदनाचा वर्षाव
राजू तुरानकर –लोकवाणी जागर
सहकार क्षेत्रातील पणन महासंघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची समजली जाते . वणी मतदार संघातील भैयाजी चवने यांनी या पणन महासंघाच्या संचालक पदाची अनेक वर्षे सूत्र सांभाळून मुंबईत छाप पाडली होती. झालेल्या निवडणुकीत केवळ दोन प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकल्याने, या चुरशीच्या निवडणुकीत वसंत जिनिंगचे संचालक संजय खाडे यांनी एकतर्फी दणदणीत विजय मिळवला.
पणन महासंघ मुंबई संचालक पदाच्या निवडणुकीत 11 मतदारांपैकी 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असता यामध्ये संजयभाऊ खाडे यांना 7 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी शेखर धोटे याना 3 मते मिळाल्याने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला व संजय खाडे संचालकपदी निवडून आले. यापूर्वी संजय खाडे यांनी वसंत जिनिंगच्या निवडणुकीत संचालकपदी विराजमान झाले , त्यामुळे वणी विभागामध्ये संजय खाडे यांच्या निवडीबद्दल कौतुक होत असुन विधानसभेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांचे मित्र परिवारातील प्रा.डॉ. शंकरराव वऱ्हाटे, तेजराज बोढे, जयसिंगराव गोहोकार, राजू अंकीतवार, पुरुषोत्तम आवारी, राजेंद्र कोरडे, प्रमोद वासेकर यांनी अभिनंदन केले