भावेश केळकर अनंतात विलीन, काल दुर्दैवी घटनेत झाला होता मृत्यू.

0
224

ऑटो च्या अपघातात चालक गंभीर तर  ऑटो मालक जागीच ठार.

आनंद नक्षणे– प्रतिनिधी मारेगाव
काल काल कोळगाव या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. यात मालक जागीच ठार तर चालक हा गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ८ जानेवारी रोज सोमवारी दुपारी3 वाजेच्या सुमारास घडली होती.  भावेश विकास केळकर रा.मारेगाव, असं मृत तरुणाचं नाव आहे. अपघात इतका भयानक होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला आठवणी तीन ते चार पलट्या खाल्ल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगत होते .

काल दुपारी अंदाजे 3 वाजेच्या सुमारास ऑटोने मारेगाव कडून कोलगाव येथे दिनेश ऊईक यांच्या कडे जेवण करण्यासाठी जात होते. संजय ठक आटो क्रमांक एम. एच.29A. M.0496 आटो नंबर आहे संजय ठक यांच्या शेता जवळ ऑटो चालवणाऱ्या चालकाचा अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटोणे रस्त्यालगत दोन ते तीन वेळा पलटी मारली, यात ऑटो चे मालक भावेश केळकर रा. मारेगाव हा विवाहित तरुण जागीच ठार झाला तर दिनेश ऊईके रा. वडगांव हल्ली मुक्काम कोलगाव हा गंभीर जखमी झाला असून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वणी येथे हलविण्यात आले आहे.

भावेश केळकर वर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. आज बारा वाजता मारेगाव येथील मोक्षधाम वर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेने संपूर्ण मारेगाव शहरात शोककळा पसरलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here