प्रगती नगर येथे राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

0
164

प्रगतीनगर येथे राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

विविध स्पर्धा घेत, महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न.

राजू तुरानकर_संपादक लोकवाणी जागर

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रगती नगर वणी येथे  धनलक्ष्मी महिला बचत गट, आनंदी महिला बचत गट, रेणुका महिला बचत गट, जगन्नाथ बाबा महिला भजन, मंडळ व शीतला माता देवस्थान कमिटी यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष वंदनाताई आवारी जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तथा प्रमुख मार्गदर्शक अँड.वैशाली टोंगे (कवाडे) चंद्रपूर, तसेच डॉ.प्रिती राहुल खाडे , नेत्रतज्ज्ञ, माजी नगराध्यक्षा आशाताई टोंगे, कमलबाई मिलमिले, कुंदाताई वरारकर व संयोजिका रिता पहापळे उपस्थित होत्या.

चुमळे ताई व संच यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना पुरुषोत्तम आवारी यांनी अंधश्रद्धा या विषयावर स्त्रियांना  मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अँड.वैशालीताई टोंगे यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई यांनी स्त्रियांसाठी व समाजासाठी केलेले कार्य सांगितले तसेच संविधानात महिलांना असलेल्या कायदेविषयक तरतूदी बद्दल माहिती दिली. तसेच डॉ.प्रिती खाडे यांनी डोळ्यांचे आजार , व घ्यावयाची काळजी यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिताताई राजू तुराणकर यांनी केले, तर प्रास्ताविक रिता पहापळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन शारदा राजेश पहापळे यांनी केले.

याप्रसंगी प्रगती नगर प्रभाग क्रमांक ३ मधील रजनी मांडवकर ,संगीता तुराणकर, राखी वैघ, माधूरी गोहणे, संगिता बोथले, विना मांडवकर, उज्वला विधाते, संजिवनी मोहितकर, संगीता चिकटे, ज्योती कापसे, नलिनी उरकुडे, सुनिता बदखल, वर्षा देशपांडे, सुरेखा जेऊरकर, बेबी थाटे व असंख्य महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here