श्री काशी शिवपुराण कथा आयोजन अनुषंगाने आज महत्त्वपूर्ण बैठक.
कोर कमिटीतील सदस्यांना उपस्थित राहण्याचे राजकुमार जायस्वाल यांचे आवाहन.
२३ जानेवारीला कथा स्थळी ‘दिव्य सुंदर कांड’ कथेचे आयोजन.
राजू तुरानकर – संपादक लोकवाणी जागर.
वणी शहरात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप जी मिश्रा यांचे मधुर वाणीतून ” न भूतो न भविष्यती “ अश्या श्री शिवपुराण महा कथेचे आयोजन २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दुपारी १ते ४ वाजेपर्यंत या कालावधीत करण्यात आले आहे. महापूजेच्या अनुषंगाने पळसोनी फाटेवरील कथा वाचक स्थळी या ठिकाणची तयारी अंतिम चरण मध्ये पोहोचली आहे. त्या अनुषंगाने आज आयोजक समितीतील कोर कमिटीच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक 19 जानेवारी दुपारी 3 वाजता पळसोनी फाटा (परसोडा) कथा स्थळी आयोजित केली आहे.
याच अनुषंगाने दिनाक २३ जनवरी २०२४ ( मंगलवार )
श्री काशी शिवमहापुराण मंडप स्थळी सत्यनारायण पूजा सकाळी 10:30 वाजता आयोजित केली आहे, या सत्यनाराणाच्या पूजेत कोर कमिटीच्या सर्व सदस्यांना पती पत्नी (जोडपे) पूजेत बसता येणार आहे. त्यानंतर
“दिव्य सुन्दरकाण्ड” चे आयोजन दुपारी १२ वाजता आयोजित केले आहे. त्यानंतर हवन, पूजन, महाआरती करून दुपारी १ वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व समितीतील सेवाधारी सदस्यांना उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आवाहन राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जायस्वाल व आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.