आजचे स्वच्छता अभियान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र के नाम. जैताई माता मंदिर, श्री राम मंदिर, प्रगती नगर मध्ये स्वच्छ्ता अभियान संपन्न.
नगर सेवा समितीचे 13 वर्षापासून दर रविवारी पहाटे स्वच्छ्ता अभियान.
राजू तुरानकर – संपादक.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे 22 जानेवारीला होणार आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये मंदिर परिसर, गावागावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज वणी शहरात आमदार संजीव रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली श्री राम मंदिर स्वच्छ करून परिसरात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले यावेळी दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी बेलूरकर , संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते , श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, विलास निमकर, लवलेश लाल, प्रवीण पाठक, नितिन बिहारी,आशिष डंभारे, संध्याताई अवताडे, आरती ताई वांढरे, स्मिता नांदेकर यांनी सेवा दिली.
मागील तेरा वर्षा पासून दर रविवारी पहाटे स्वच्छता करण्यात येत असते, नगर सेवा समितीचे आजचे अभियान प्रभू श्री रामचंद्र के नाम करण्यात जैताई माता मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले. नामदेवराव शेलवडे, दिनकरराव ढवस, दिलीप कोरपेनवार, राजू तुरानकर, नितिन बिहारी, गुलाबराव निते, विकास जयपूरकर यांचे सेवेत हे अभियान संपन्न झाले.
प्रगती नगर मध्ये महादेवराव खाडे, उमापती कुचनकर, रमेश खंगण, राजू तुरानकर यांचे उपस्थितीत ओपन जिम परिसरात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.