तालुक्यात एका दिवशी दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या.

0
551

वेगवेगळ्या ठिकाणी दोघांची गळफास लावून आत्महत्या.

अल्पवयीन मुलांचा घातकी निर्णय.

देशभरात झालेल्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे, अश्यातच काल वणी विधानसभा क्षेत्रात दोन तरुणांची आत्महत्या सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

ज्योसना अय्या आत्राम वय १५ रा .पेढरी (सुसरी) पो.स्टे.मारेगांव हिने काल सायंकाळी दि.२०/०१/०२४ ला आपल्या राहत‌‌‌ असलेल्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली ही बाब घरच्या मंडळींना लक्षात आली असता त्यांनी तात्काळ रात्री च्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी ज्योसना मृत घोषित केले.  पो स्टे वणी यांना रीतसर तक्रार दाखल केली असून. आज सकाळी दि.२१/०१/०२४ पोस्ट मार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. एवढ्या कोवळ्या वयात आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजनही अनुत्तरित आहे पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

शिवणी जहागीर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

गुंजन अशोक राजुरकर वय.२२ रा..शिवनी (जहागीर) पो. स्टे. शिरपुर या तरुणाने काल सायंकाळी घरी कोनीही नसतांना आपल्या राहत्या घरी गळफास लावून, जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

ही बाब घरच्या मंडळींना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पो स्टे शिरपुर यांना कळविले, पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी आणण्यात आला असून सदर मॄतदेहाचे आज सकाळी पोस्ट मार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.  पुढील तपास शिरपुर पोलिस करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here