श्री काशी शिवपुराण कथेच्या अनुषंगाने उद्या वणी शहरात भव्य शोभा यात्रा.

0
584

श्री काशी शिवपुराण कथा आयोजन अनुषंगाने जय्यत तयारी. शिभकतांमध्ये प्रचंड उत्साह.

उद्या सायंकाळी  4 वाजता वणी शहरात भव्य शोभा यात्रा 

जड वाहनांना वळण रस्त्याचा उपयोग करण्याचे आवाहन.

काल रात्री पासूनच शिवजीची भक्त मंडळी कथा स्थळी.

राजू तुरानकर –वणी.

वणी शहरात “न भूतो न भविष्यती” अश्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.सुप्रसिद्ध कथावाचक प्रदीप जी मिश्रा यांचे मधुर वाणीतून श्री शिवपुराण महा कथेचे आयोजन २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. महापूजेच्या अनुषंगाने परसोनी (परसोडा) फाटेवरील कथा वाचक स्थळी या ठिकाणीची जय्यत तयारी झाली असून,  उद्या सायंकाळी वणी शहरात कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत भव्य शोभा यात्रा निघणार आहे.  27 जानेवारी पासून कथेला प्रारंभ होणार आहे.

कथेच्या अनुषंगाने शिवभक्तामध्ये प्रचंड उत्साह असून सात आठ लाख भाविकांचे आगमन होण्याची शक्यता आहे.या निमित्ताने अडथळे निमार्ण होवू नये म्हणून वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहे. भागवत प्रवचन सुरू असेल या कालावधीत मारेगाव जाण्यासाठी नांदेपेरा ते मार्डी रस्त्याचा उपयोग प्रवाश्यांना करावा लागणार आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेत या मार्गावरून काही विशेष वाहने वगळून वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेचा दृष्टीकोनातून 50 cctv लावण्यात आले आहे. लांबच्या भाविकांना दुरून पाण्यासाठी 12 led वॉल लावण्यात आले आहे. महिला पुरुष एकत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल कँप लावण्यात आले आहे, इमार्जन्सी अँब्युलन्स व अग्निशमन दल कथा स्थळी ठेवण्यात येणार आहे. व्हीआयपी स्वागत गेट व त्यांच्या साठी कथा स्थळी स्पेशल पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

मुक्कामाने कथा स्थळी असणाऱ्या भाविकांसाठी 130 स्वच्छता गृह, 60 मोबाईल टॉयलेट ठेवण्यात आले आहे.
कथा स्थळी विशेष पोलीस दलासाठी कॅट्रोल रूम लावण्यात आली आहे.  सकाळ संध्याकाळ मिळून 60000 लोकांची रोज मोफत जेवण व चाहा ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सभा स्थळा पासून दोन किलोमिटर पेड पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या शुभ शांतता, स्वच्छ्ता समितीचा कार्यासाठी 30 वेगवेगळ्या कमिटी बनविण्यात आलेल्या आहे. यात 140 सेवकांची मुख्य कोर सूत्रधार कमिटी बनविण्यात आली आहे. या माध्यमातून 1400 सेवक सेवा देणार आहे.

उद्या भव्य शोभा यात्रा …..

शिवपुराण कथेच्या अनुषंगाने उद्या वणी शहरातून भव्य शोभा यात्रा कथा वाचक पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता राज जायसवाल यांचे घरापासून नांदेपेरा रोड या ठिकाणी सुरू होवून साई मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खाती चौक, गांधी चौक, तुटी कमान, टागोर चौक ते टिळक चौक येथे येवून शोभा यात्रेचे समारोप होणार आहे.

कथा स्थळी भक्तमंडळी काल रात्री पासूनच मुक्कमाने येण्यास सुरुवात झाली आहे.

कथा स्थळी येणाऱ्या भाविकांनी शांतता, स्वच्छता पाळावी, तसेच जड वाहनांनी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत वळण रस्त्याचा उपयोग करण्याचे आवाहन राजकुमार जायसवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here