प्रा.डॉ. सुशील अण्णाजी वावरकर आचार्य(डॉक्टरेट ) पदवीने सन्मानित.
संगीत विषयात अमरावती विद्यपीठाची मानांकित आचार्य पदवी.
राजू तुरानकर –वणी.
श्री गणेश कला महाविद्यालय कुंभारी (अकोला) संगीत विभागात कार्यरत प्रा. सुशील अण्णाजी वावरकर यांनी नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती ची संगीत विषयात मानांकित आचार्य पदवी प्राप्त केली.
त्यांनी ” स्वरगंधर्व श्री.सुधीर फडके (बाबूजी) यांच्या निवडक गीत रचनां मधील सांगीतिक सौंदर्य तत्व विश्लेषण – एक संशोधनात्मक अभ्यास ” ह्या विषयात संशोधन केले. त्यांनी संशोधनाचे कार्य प्रो.डॉ.अर्चना अंभोरे , संगीत विभाग प्रमुख , श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय , अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली केले . त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई सुमनताई , वडील श्री. अण्णाजी वावरकर यांच्यासह परिवारातील सर्वच सदस्य, तसेच गुरु स्व.श्री.गणेश वाटकर , डॉ.माणिक मेहरे मॅडम आणि ज्येष्ठ संगीतज्ञ आदरणीय डॉ.श्री हरिभाऊ खंडारे सर , डॉ. राजीव बोरकर तसेच पी.एच.डी. रिसर्च सेंटरच्या प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले मॅडम , उप प्राचार्य डॉ. पांडे सर , प्रा.परिमल मुजुमदार सर आणि महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद , तसेच श्री गणेश कला महाविद्यालय, कुंभारी चे संस्थाध्यक्ष प्रा. तुकाराम भाऊ बिरकड , प्रकाश भाऊ बिरकड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. व्ही. मेहरे , संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील पारिसे व संगीत विभागातील सर्वच सहकारी मित्र मंडळी यांना दिले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.