संत शिवसैनिकांनी केला रस्ता मारेगावात रोको

0
30

घरकुल लाभार्थ्यांना मोफत मिळत नसल्याने शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन. शिवसेनेच्या संतापाला तहसीलदारांना जावे लागले सामोरे.

यवतमाळ महामार्ग मारेगाव रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील रोडवर वाहतूक ठप्प, शेकडो शिवसैनिक तथा घरकुल लाभार्थी उतरले रस्त्यावर.

मारेगाव : मारेगाव तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही, परंतु अवैध वाहतूक रात्री च्या सुमारास सुरु असताना महसूल विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होता, महसूल विभागाचे निदर्शनास आणून दिले असता त्यावर कोणतीही चौकशी,कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आज शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात मोदी घरकुल योजना सुरू आहे परंतु त्यांना रेती मिळत नाही. बुकिंग बंद आहे,हे कारण पुढे करून हे चोरटे अवैध वाळू वाहतूक रात्री कशी काय वाहतुक करीत आहे ? असा सवाल तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी उपस्थित करित तहसीलदार यांना आंदोलन स्थळी पाचारण करून आमच्या तक्रारी निवेदनाचे काय झाले याबाबत खुलासा करा, अशी ताठर भूमिका घेत उपविभागीय अधिकाऱ्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. त्यानंतर आंदोलन निवळले.

परिणामी या संदर्भात वरिष्ठांना तक्रारी केल्या आहेत, परंतु आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने शेवटी ‘चक्का जाम आंदोलन’ करण्यात आले.असे विशाल किन्हेकार यांनी माध्यमाना सांगितले.

हे आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधाकर गोरे वणी तालुका प्रमुख किशोर नांदेकर, मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम, तालुका संघटक प्रवीण बलकी, उपसरपंच प्रशांत भंडारी, सरपंच सुरेश लांडे यांच्या सह शेकडो शिवसैनिक व घरकुल धारक रस्त्यावर उतरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here