मेंढोलीच्या युवकाची वणीत आत्महत्या.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
लोकवाणी जागर.
वणी : गुरूनगर येथील परिसरात भाड्याच्या घरी राहणाऱ्या एका कॉलेज विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
विवेक उमाकांत बोंडे (20) असे गळफास घेतलेल्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विवेक हा मेंढोली येथील रहिवासी असून तो मारेगांव येथील एका महाविद्यालयात बि.एस.सी. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. तो बहिणी सह शहरातील गूरूनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. गुरूवारी त्याची बहीण काही कामानिमित्त गावला गेली असता, विवेक खोली एकटाच होता, त्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली, त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनानंतर गावाला अंतिम संस्कार करण्यात आले.
विवेकच्या आत्महत्याचे कारण गुलदस्त्यात असून त्याच्या निधनाने मेंढोली परिसरात शोककळा पसरली. घटनेचा पुढील तपास पोलीस करित आहे.