अल्पवयीन मुलीवर वर मातृत्व लादणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
मारेगाव तालुक्यातील घटन.
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव : तालुक्यातील अंदाजे 17 वर्षीय अल्पवयीन मुली वर मातृत्व लादणाऱ्या 22 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करून त्याचा शोधाशोध घेऊन रात्री अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपी संजय विलास जुमनाके रा. टाकरखेडा असे पोलिसात गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिडीत मुलगी चार महिन्याची गर्भवती असल्याचे तपासणी अंती उघडकीस आले असता, पीडितेच्या आईवडिलांसह तीने अखेर आरोपीविरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली,
आईने पिडीत मुलीला घेतलं विश्वासात आणि फुटलं बिंग
पिडीतीने आपल्या आईला मागील दोन दिवसापू्वीच गर्भाशय पिशविला रक्ताची गाठ असल्याकारणाने पोटात दुखत असल्याचे सांगितले होते. दरम्यान,मुलीला घेऊन चंद्रपूर या ठिकाणी एका रुग्णालयात ते गेले. वैद्यकीय तपासणी अंती ‘ती’ पिडीता ‘चार’ महिन्यांची ‘गर्भवती’ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आणि घरच्यांच्या पायाखालची जागाच सरकली. घरी परतल्या वर आईने मुलीला विश्वासात घेत सर्व प्रकार विचारले असता पिडीत मुलीने …….. याने माझ्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असे कथन केले.
संतापलेल्या आईवडीलांनी पिडीत मुलीला घेऊन पोलिस स्टेशन गाठून त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, दिलेल्या तक्रारीनुसार ‘त्या’ अत्याचारी तरुणावर बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोधाशोध घेतला असता आरोपीला अमरावती येथून रात्री अटक करण्यात आली.
सदर प्रकरणी पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.