वणीतील किराणा दुकानदाराची आत्महत्या.

0
866

वणी शहरात पुन्हा एक आत्महत्या..
काल झालेल्या एकाच दिवशी दोन आत्महत्येचा घटनेने वणी शहर हादरले आहे.

लोकवाणी जागर वृत 

वणी शहर व परिसरात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्ये चे पाऊल उचलुन राहीले.
आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान नवीन वागधरा येथील निर्गुडा नदिचे काठावर झुडपात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
किसन गोसावीराम पारोथी (५२) वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.किसान यांचे गणेशपुर रोड शिवनेरी चौक येथे किराणा दुकान आहे. दुकाना सोबत तो साउंड सर्वीसचे काम सुध्दा करीत होता.
दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्या नंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.
किसन हा मेहनती व्यक्ती होता. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता.किसान यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here